Nanda Khare Death : ज्येष्ठ लेखक कादंबरीकार नंदा खरे यांचं निधन, 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nanda Khare Passes Away : अत्यंत अभ्यासपूर्ण साहित्य लेखन करणारा लेखक अशी नंदा खरे यांची ओळख होती. 'अंताजीची बखर' ही त्यांची विशेष गाजलेली कादंबरी होती.
पुणे: राज्यातल्या साहित्य विश्वासाठी अत्यंत दु:खद बातमी आहे. ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अनंत उर्फ नंदा खरे (Veteran Marathi Writer Nanda Khare Passes Away) यांचे आज पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घकाळापासून आजारी होते. नंदा खरे यांच्या निधनामुळे साहित्य विश्वामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अनंत खरे यांची ओळख नंदा खरे अशी होती. नंदा खरे याच नावाने ते साहित्य लेखन करायचे. अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन करणारा साहित्यिक म्हणून नंदा खरे मराठी साहित्य विश्वात प्रसिद्ध होते. त्यांच्या अनेक कादंबऱ्या गाजल्या आहेत. नंदा खरे यांची 'अंताजींची बखर' ही कांदबरी गाजली होती.
'उद्या' नावाच्या कादंबरीसाठी त्यांना 2020 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता. पण तो त्यांनी नाकारला होता. मला समाजाने आतापर्यंत खूप काही दिलं असं म्हणत त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता. अलिकडेच त्यांची 'नांगलल्यावीन भूई' ही कादंबरी प्रकाशित झाली होती.
नंदा खरे यांनी मुंबई आयआयटीमधून पदवी घेतली होती. त्यांनी अभियंता म्हणून कामही केलं आहे. नंदा खरे यांच्या निधनानंतर साहित्य विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
नंदा खरे यांचे साहित्य संपादन
-वीसळे पन्नास, वारुळपुराण, कहाणी मानव प्राण्यांची पुस्तकं प्रकाशित.
-'अंताजीची बखर' हे विशेष गाजलेले पुस्तरक
-'नांगलल्यावीन भूई' ही त्यांची कादंबरी अनेकांना आकर्षित केली.
महत्त्वाच्या बातम्या:
- 11th Admission : सीबीएसई दहावी बोर्डाच्या निकालानंतर रखडलेल्या ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा
- National Film Awards 2022 Winners List : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; जाणून घ्या विजेत्यांची यादी
- Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, आज 2,515 रुग्णांची नोंद तर सहा जणांचा मृत्यू