एक्स्प्लोर
...म्हणून मंत्री/आमदारांना 1 किमी चालावचं लागणार !

नागपूर : हिवाळी अधिवेशनात यंदा नेत्यांपुढे फिटनेस टेस्टचं आव्हान असेल. कारण, सुरक्षेच्या कारणास्तव यंदा पहिल्यांदाच मंत्री/आमदारांच्या वाहनांना गेटपर्यंतच प्रवेश देण्यात येत आहे. म्हणून प्रवेशद्वार ते सभागृह इतकं १ किलोमीटरचं अंतर चालतच कापावं लागणार आहे. या संपूर्ण रस्त्यावर रेड कार्पेटही अंथरण्यात आलं आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव आमदारांना दररोज 1 किमीचं अंतर चालत जावं लागणार आहे, त्यामुळे हा त्यांच्यासाठी मॉर्निंग वॉकच असेल, असं नागपुरात चर्चिलं जात आहे.
हिवाळी अधिवेशनावर नेहमीच दहशतवादी आणि नक्षलवादी हल्ल्याचं सावट असतं. मात्र यंदा पहिल्यांदाच सुरक्षेच्या कारणास्तव ठोस पावलं उचलण्यात आली आहेत.
पोलिसांच्या अंगावर कॅमेरे
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी नागपूर पोलिसांनी हाईटेक नियोजन केले आहे. विधानभवनच्या अवती- भवतीच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी पहिल्यांदाच ड्रोन कॅमेरे वापरले जाणार आहेत. शिवाय मोर्चे हाताळताना पोलिसांच्या शरीरावर ही बॉडी कॅमेरे लावले जाणार आहेत.
सुमारे साडे सहा हजार पोलिस आणि 800 अधिकारी अधिवेशनाच्या सुरक्षा व्यवस्थेत नेमले जाणार आहेत. नागपूरचे पोलिस आयुक्त के वेंकटेश यांनी याबाबतची माहिती दिली.
अतिरिक्त आयुक्त दर्जाचा अधिकारी सुरक्षा व्यवस्थेचा प्रमुख असेल. त्यांच्या मदतीला 22 उपायुक्त, 33 सहाय्यक आयुक्त, 136 पोलिस निरीक्षक आणि 615 सहाय्यक निरीक्षक नेमले जाणार आहेत.
यंदाच्या अधिवेशन काळात विदर्भवाद्यांचा, ओबीसी संघटनांचा आणि सकल मराठा कुणबी समाजाचे मोठे मोर्चे निघणार आहेत. त्यामुळे यंदा पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था जास्त भक्कम केली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी नागपुरात विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असताना, दोन वेळा मोर्चेकऱ्यांवर लाठीचार्जच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे यावेळी पोलिसांनी मोर्च्यावर जास्त लक्ष ठेवले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
