(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NMC : चार खाजगी रुग्णालयांविरुद्ध मनपाची कारवाई; दोन लाखांचा दंड वसूल
Nagpur News: सामान्य कचऱ्यात वैद्यकीय कचरा टाकल्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शहरातील चार रुग्णालयांवर कारवाई करुन दोन लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
Nagpur News : नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) उपद्रव शोध पथकाने 12 आस्थापनांवर कारवाई करून 2 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ झोन, हनुमाननगर झोन, गांधीबाग झोन आणि मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाने विविध प्रकरणी कारवाई केली. गांधीबाग आणि मंगळवारी झोन उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 04 आस्थापनांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करीत 9 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला. तसेच 4 खाजगी रुग्णालयांच्या (Private Hospital) विरोधात इतर रस्त्यालगत इतर कचऱ्यासह वैद्यकीय कचरा आढळल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
उपद्रव शोध पथकाने (NDS) प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत महाल, गांधीगेट येथील अर्जू भांडार आणि सरताज अगरबत्ती या दुकानांविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच गांधीबाग पोस्ट ऑफिस येथील संजय ट्रेडर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर मंगळवारी झोन अंतर्गत छावणी सदर येथील दिल्ली ग्रील रेस्टोरेंट या उपहारगृह विरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सामान्य कचऱ्यात वैद्यकीय कचरा
त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत रामदास पेठ येथील गॅस्ट्रो व्हिजन हॉस्पिटल आणि मेडिग्रेस हॉस्पिटल यांच्या विरुद्ध रस्त्यालगत इतर कचऱ्यासह वैद्यकीय कचरा आढळल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर गोपालनगर येथील हेडाऊ बिल्डर्स यांच्या विरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
धरमपेठ झोन अंतर्गत रामदासपेठ येथील ऑर्थो हॉस्पिटल आणि रेस्पिरे हॉस्पिटल यांच्या विरुद्ध रस्त्यालगत इतर कचऱ्यासह वैद्यकीय कचरा आढळल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच रामदासपेठ येथील मेडिकेअर क्लिनिक यांच्या विरुद्ध स्त्यालगत इतर कचऱ्यासह वैद्यकीय कचरा आढळल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.हजारिपहाड येथील महेंद्र बोरकर यांच्या विरुद्ध रस्त्यालगत कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत न्यू नरसाळा रोड येथे लाल पॅथॉलॉजी लॅब यांच्या विरुद्ध रस्त्यालगत कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
इतर महत्त्वाची बातमी