एक्स्प्लोर

Man Called Girl 'Item' : तरुणीला 'आयटम' म्हणणं तरुणाला पडलं महागात, कोर्टाने सुनावली दीड वर्षांची शिक्षा

Man Called Girl 'Item' : न्यायालयाने म्हटले, जेव्हा एखाद्या मुलीला उद्देशून 'आयटम' हा शब्द वापरला जातो, तेव्हा ते मुलीचे लैंगिक शोषण मानले जाईल.

Man Called Girl Item :  लैंगिक शोषणाच्या प्रकरणात (POCSO) मुंबईतील एका न्यायालयाने (Mumbai) एका व्यक्तीला दीड वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एका अल्पवयीन मुलीला 'आयटम' बोलवून तिचा विनयभंग केल्याचा आरोप या व्यक्तीवर आहे. न्यायालयाने म्हटले, जेव्हा एखाद्या मुलीला उद्देशून 'आयटम' हा शब्द वापरला जातो, हे मुलीचे लैंगिक शोषण मानले जाईल.

एक महिन्यापासून मुलीचा पाठलाग

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईतील POCSO कोर्टाने 26 वर्षीय व्यावसायिकाला 16 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. 2015 मध्ये आरोपीने शाळेतून परतणाऱ्या मुलीचे केस ओढत म्हटले 'क्या 'आयटम' कहाँ जा रही है?' न्यायालयाने सांगितले की, आरोपी एक महिन्यापासून लैंगिक हेतूने मुलीचा पाठलाग करत होता

रोडसाइड रोमिओंना धडा शिकवणे आवश्यक -न्यायाधीश एसजे अन्सारी
माहितीनुसार, आरोपीच्या चांगल्या वागणुकीमुळे माफीची याचिका फेटाळून लावताना विशेष न्यायाधीश एसजे अन्सारी म्हणाले की, महिलांना अन्यायकारक वागणुकीपासून वाचवण्यासाठी अशा गुन्ह्यांवर कठोरपणे कारवाई करणे आवश्यक आहे. अशा रोडसाइड रोमिओंना धडा शिकवणे आवश्यक आहे. एका 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या व्यावसायिकाला पोक्सो कोर्टाने दोषी ठरवले. मुलीच्या पालकांना तरुणाने त्यांच्या मुलीसोबत केलेली मैत्री आवडत नसल्यामुळे त्यांना या प्रकरणी अडकविण्यात आले होते. या अल्पवयीन मुलीला जुलै महिन्यातच न्यायालयात हजर करण्यात आले होते.

एकमेव साक्षीदार असलेल्या अल्पवयीन मुलीने सांगितले की...
या प्रकरणातील एकमेव साक्षीदार असलेल्या अल्पवयीन मुलीने सांगितले की, ती 14 जुलै 2015 रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास शाळेत जात होती. आरोपी त्याच्या गल्लीत बसला होता. तो त्याच्या मित्रांसोबत होता. मुलीने पुढे सांगितले की, जेव्हा ती दुपारी 2.15 च्या सुमारास शाळेतून परतली. त्यानंतरही आरोपी रस्त्यात दुचाकीवर बसला होता. तिला पाहताच तो तिच्या मागे आला, असे अल्पवयीन मुलीने सांगितले. तसेच त्या तरुणाने तिचे केस ओढले आणि तिला आयटम बोलला.

मुलीने लगेच 100 नंबर डायल केला

मुलीने सांगितले की, जेव्हा त्याने माझ्यासोबत असे केले तेव्हा मी त्याला धक्काबुक्की केली आणि असे करू नकोस असे सांगितले. यानंतर आरोपीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि मला हवे ते करेन असे सांगितले. अल्पवयीन मुलीने लगेच 100 नंबर डायल केला. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी पळून गेले होते. यानंतर मुलीने वडिलांना घटनेची माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget