Nagpur Lok Sabha Election : नागपूर मतदारसंघात भाजप-कांग्रेसची प्रतिष्ठा पणाला; रणरणत्या उन्हात दिग्गज नेते प्रत्यक्ष मैदानात
Nagpur Lok Sabha Election : नागपूरात उष्णतेच्या पाऱ्याने केव्हाच चाळीशी ओलांडली असली तरी या रणरणत्या उन्हाची कुठलीही तमा न बाळगता नागपूरतील दोन दिग्गज नेते प्रत्यक्ष मैदानात उतरल्याचे चित्र आहे.
Lok Sabha 2024 Nagpur : नागपूरसह विदर्भात उष्णतेचा पारा दिवसागणिक तापत असतानाच आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha 2024) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाचे राजकारण देखील चांगलेच तापताना दिसत आहे. नागपूरात (Nagpur) उष्णतेच्या पाऱ्याने केव्हाच चाळीशी ओलांडली असली तरी या रणरणत्या उन्हाची कुठलीही तमा न बाळगता नागपूरतील दोन दिग्गज नेते प्रत्यक्ष मैदानात उतरल्याचे चित्र आहे.
एकीकडे आपल्या विकासकामामुळे देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे भाजपचे हेवेवेट नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या जनसंवाद यात्रेतून मतदारच्या दारापर्यंत जात आहेत. तर दुसरीकडे कधीकाळी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या नागपूरचा गड पुन्हा काबीज करण्याच्या इराद्याने यंदा काँग्रेसने नितीन गडकारींविरोधात विकास ठाकरे (Vikas Thakre) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता विकास ठाकरे हे देखील प्रत्यक्ष मैदानात उतरून मतदारांना साद घालत असल्याचे चित्र आहे.
रणरणत्या उन्हात दिग्गज नेते प्रत्यक्ष मैदानात
लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha 2024) पडघम वाजाले असून जवळ जवळ सर्वच पक्षानी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. अशातच येत्या 19 एप्रिल रोजी पूर्वविदर्भात पाच लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून या निवडणुकांना आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षानी मतदारसंघात आपल्या प्रचाराचा जोरदार धूरळा उडवला असल्याचे चित्र आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून महायुती आणि भाजपचे उमेदवार असलेले विद्यामन खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी गेल्या काही दिवसांपासून आपला रीतसर प्रचार सुरू केला आहे.
नितीन गडकरी हे आपल्या लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून मतदारच्या दारापर्यंत जात सलग तिसऱ्यांदा विजयासाठी साद घालत आहेत. तर काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते हे देखील आज दक्षिण नागपूरात आज आपल्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे बघायला मिळाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा चुरशीचा सामना रंगणार हे मात्र निश्चित आहे.
उत्तर नागपूरमधून यंदा मोठ्या मताधिक्याने आघाडी घेऊ
उत्तर नागपूरमधून यंदा किमान 30 ते 40 हजारांची आघाडी घेऊ असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना केला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी फक्त उत्तर नागपूरमध्येच गेल्या वेळेला भाजप पिछाडीवर होतं. तीच पिछाडी भरून काढण्यासाठी यंदा उत्तर नागपूरवर भाजपने खास लक्ष केंद्रित केलं असून आज गडकरी उत्तर नागपूरातील मैदानात उतरले आहे.
मी नागपूरचा असून नागपूर माझं कुटुंब आहे. मी कधीही जात, धर्म, पंथ असा भेद केला नाही आणि त्यामुळेच नागपूरमध्ये सर्व लोक माझ्यावर प्रेम करतात आणि हीच माझी राजकीय पुंजी असल्याचे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेय. उत्तर नागपूर मधील मागील वेळची पिछाडी मोठ्या मताधिक्याने यंदा भरून काढू असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय.
इतर महत्वाच्या बातम्या