एक्स्प्लोर
गडकरी पुतळा प्रकरण : ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्लेंची सडेतोड भूमिका

पिंपरी चिंचवड : "राम गणेश गडकरी यांनी संभाजी महाराजांविषयी चुकीचं लिहिलं असेल, तर त्यांचा निषेध करा, ते खोडून काढा, वाद-प्रतिवाद करा, हवं तर गडकरी कसे चुकीचे आहेत, यावर पुस्तक लिहा. मात्र, गडकरींचा पुतळा हटवून मांडलेली भूमिका अतिशय चुकीची.", असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांनी दिला आहे. दिशा सोशल फाऊंडेशनने विध्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या 'साहित्यिक आपल्या भेटीला' या उपक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
"इंग्लंडमधील लोकशाहीचे कौतुक का होतं, कारण तिथं चर्चा विनिमयाला स्वातंत्र्य आहे. तेव्हा भारतीय लोकशाहीत देखील हेच घडणं अपेक्षित आहे. सरकार आणि महापालिकेने याचा विचार करावा.", असे मत कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले. नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचं परखड मत ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केलं. नागरिकांकडे पैसे नसल्यानं शेतकऱ्यांना माल रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. विचारपूर्वक आणि पूर्वनियोजन नसल्यानं हा निर्णय किती वाईट आहे, हे अनेक अर्थशास्त्रांनी सांगितले. त्यामुळं मी नव्यानं काही बोलण्याची काही गरज नसल्याचं कोत्तापल्ले म्हणाले.
"इंग्लंडमधील लोकशाहीचे कौतुक का होतं, कारण तिथं चर्चा विनिमयाला स्वातंत्र्य आहे. तेव्हा भारतीय लोकशाहीत देखील हेच घडणं अपेक्षित आहे. सरकार आणि महापालिकेने याचा विचार करावा.", असे मत कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले. नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचं परखड मत ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केलं. नागरिकांकडे पैसे नसल्यानं शेतकऱ्यांना माल रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. विचारपूर्वक आणि पूर्वनियोजन नसल्यानं हा निर्णय किती वाईट आहे, हे अनेक अर्थशास्त्रांनी सांगितले. त्यामुळं मी नव्यानं काही बोलण्याची काही गरज नसल्याचं कोत्तापल्ले म्हणाले. संबंधित बातम्या :
गडकरींचा पुतळा हटवणाऱ्यांचा बोलवता धनी शोधू : मुख्यमंत्री ऑडिओ : राम गणेश गडकरींच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी आचार्य अत्रेंचं भाषण संभाजी उद्यानातून हटवलेल्या गडकरींच्या पुतळ्याचा भाग नदीत सापडला गडकरींचा पुतळा हटवणारे सीसीटीव्हीत कैद राम गडकरींचा पुतळा हटवला, कोणाची काय प्रतिक्रिया? नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडने हटवला!आणखी वाचा























