एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

147 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींचा निकाल आज

मुंबई : मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे अवघ्या काही तासात स्पष्ट होणार आहे. आज सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यात प्रथमच मतदान झालं आहे. 147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतीसाठी एकूण 165 ठिकाणी मतदान पार पडलं. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी 70 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी हाती आली आहे. ग्रामीण भागात सध्या चुरस रंगली आहे. राज्यातील प्रमुख पक्ष शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा या निवडणुकीमध्ये कस लागणार आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आणि कोण पराभूत होणार हे चित्र स्पष्ट होण्यासाठी काही तासच उरले आहे. दरम्यान, यावेळी थेट जनतेमधून नगराध्यक्षाची निवड होणार आहे. या निवडणुकांकडे मिनी विधानसभा या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. त्यामुळे फडणवीस सरकारचीही चाचणी घेणारी ही निवडणूक मानली जात आहे. नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण आकडेवारी एकूण प्रभाग - 1,967 सदस्यपदांच्या जागा - 3,705 थेट नगराध्यक्षपदांच्या जागा - 147 एकूण मतदान केंद्रे- 7,641 एकूण मतदार - 58,49,171 पुरुष मतदार - 30,20,683 स्त्री मतदार - 28,28,263 इतर मतदार - 225 सदस्यपदांसाठी उमेदवार - 15,826 बिनविरोध विजयी सदस्य - 28 थेट नगराध्यक्षपदांसाठीचे उमेदवार - 1,013 मतदानाची वेळ - स. 7.30 ते सा. 5.30 मतमोजणी - 28 नोव्हेंबर 2016 मतमोजणीची वेळ - सकाळी दहापासून या दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला राज्यातील 147 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींच्या चुरशीच्या निवडणुकीच्या निकालाआधी अनेक दिग्गज नेत्यांचा जीव टांगणीला लागला आहे. कारण काही आमदारांच्या पत्नीच नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागली आहे. - पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना त्यांच्या पत्नी मंदाताई यांच्यासाठी परतूरमध्ये प्रतिष्ठा पणाला लावावी लागली. साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे यांना कडवी लढत द्यावी लागली. - अमरावतीमधील दर्यापूरचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नीलिम भारसकळे यांच्या विरोधात त्यांचे दीर सुधाकर भारसाकळे अशी लढत झाली. - माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या पत्नी अनिता नाईक या पुसदमधून आणि विधान परिषद आमदार अमरीश पटेल यांच्या पत्नी जयश्रीबेन यांचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून नगराध्यक्ष होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. - जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर नगरपालिकेत अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांच्या पत्नी अनिता यांच्याविरोधात माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पत्नी पुष्पलता पाटील यांच्यातील लढतीकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष आहे. - संगमनेरमध्ये विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पत्नी दुर्गा या नगराध्यक्ष होणार की नाही, हे निकालानंतर ठरणार आहे. - माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या त्या बहिण असल्याने थोरात यांनीही त्यांचा प्रचार केला. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नीही जालन्यातून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असल्याने त्यांचीही धाकधूक वाढली आहे. - आईसाठी मंत्री जयकुमार रावलांची प्रतिष्ठा पणाला रोजगार हमी योजना आणि पर्यटनमंत्री राजकुमार रावल हे अनेक दिवसांपासून प्रचारात व्यस्त आहेत. कारण धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथून त्यांच्या आई नयनकुवरताई रावल नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. त्यांच्याविरोधात माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचे भाऊ रवींद्र देशमुख हे उभे आहेत. येथे चुरशीचा सामना झाल्याने रावल यांना प्रचारासाठी कठोर मेहनत घ्यावी लागली. रावल आणि डॉ. हेमंत देशमुख हे दोघेही आमदार होण्यापूर्वी नगराध्यक्षच होते. - राज्यातील भाऊबंदकीचा निकाल चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन भाऊ आमनेसामने आहेत. भाजपचे आमदार संजय धोटे यांचे भाऊ सतीश धोटे आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसने अरुण धोटे यांना प्रतिस्पर्धी म्हणून उभे केले आहे. - बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबीयात भाऊबंदकीने डोकं वर काढलं आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप यांनी चुलत्यांच्या सत्तास्थानाला आव्हान दिलं आहे. - राष्ट्रवादीचे नेते डॉ. सतीश पाटील यांनाही त्यांचा पुतण्या कुणाल पाटील यांनी भाजपकडून आव्हान दिलं आहे. - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतण्या संदीप याने शिवसेनेत प्रवेश करून रोह्यात काकालाच आव्हान दिलं. परळीतील निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या बहिण भावात चुरशीची लढत आहे. - नवीन पिढीचा राजकीय निकाल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण्यांची नवीन पिढीचंही राजकीय भवितव्य ठरणार आहे. दिवंगत नेते गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा या श्रीरामपूरमधून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. - तासगावमध्ये दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर हे दोघे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. - अहमदनगर जिल्ह्यातील राहत्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी निवडणुकीची जबाबदारी सांभाळली. - करमाळ्यात माजी आमदार जयंतराव जगताप यांचे पुत्र वैभवराजे जगताप हे नगराध्यक्षापदासाठी रिंगणात होते. बार्शीत माजी मंत्री दिलीप सोपल यांचे पुतणे योगेश हे नगरसेवक होणार की नाही, हे निकालातून स्पष्ट होणार आहे. - शिवसेनेचे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे बंधू संजय यांचाही मेहकरमधून नगरसेवकपदाचा निकाल लागणार आहे. - भुसावळमध्ये माजी आमदार संतोष चौधरी यांचा मुलगा सचिन नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे. मतदानाची विभागनिहाय टक्केवारी कोकण विभाग: पालघर (3)- 80 टक्के रायगड (9)- 88 टक्के रत्नागिरी (5)- 88 टक्के सिंधुदुर्ग (4)- 67 टक्के पुणे विभाग: सातारा (14)- 83 टक्के सांगली (8)- 84 टक्के सोलापूर (9)- 73 टक्के कोल्हापूर (9)- 79 टक्के नाशिक विभाग: नाशिक (6)- 79 टक्के धुळे (2)- 70 टक्के नंदुरबार (1)- 74 टक्के जळगाव (13)- 68 टक्के अहमदनगर (8)- 83 टक्के औरंगाबाद विभाग: जालना (4)- 59 टक्के परभणी (7)- 76 टक्के हिंगोली (3)- 68 टक्के बीड (6)- 74 टक्के उस्मानाबाद (8)- 68 टक्के अमरावती विभाग: अमरावती (9)- 72 टक्के अकोला (5)- 67 टक्के बुलडाणा (9)- 79 टक्के वाशिम (3)- 64 टक्के यवतमाळ (8)- 60 टक्के नागपूर विभाग: वर्धा (6)- 60 टक्के चंद्रपूर (5)- 63 टक्के एकूण सरासरी– (164)- 70. धुळे दोंडाईचा :- 70 टक्के शिरपूर :- 70  टक्के सरासरी 70 टक्के उस्मानाबाद उस्मानाबाद – 60.24 टक्के तुळजापूर –  85.57 टक्के नळदुर्ग      – 71.49 टक्के उमरगा    –  64.51 टक्के मुरूम     –  66.98 टक्के कळंब     – 72.05 टक्के भूम        – 75.16 टक्के परंडा      – 76.31 टक्के सरासरी–  71.72 टक्के रायगड अलिबाग – 70 टक्के उरण –  68.31 टक्के रोहा – 80.32 टक्के खोपोली – 72.95 टक्के पेण  – 74.15 टक्के मुरुड  – 76.22 टक्के रोहा  – 80.32 टक्के श्रीवर्धन  72.73 टक्के महाड – 72.43 टक्के माथेरान  – 88 टक्के सरासरी 75.01 रत्नागिरी राजापूर नगरपरिषद- 76.38 टक्के दापोली नगरपंचायत- 73.13 टक्के खेड नगरपरिषद-  78.66 टक्के चिपळुण नगरपरिषद - 72.00 टक्के रत्नागिरी नगरपरिषद- 64.70 टक्के सिंधुदुर्ग सावंतवाडी- 67.41 टक्के मालवण- 73.44 टक्के वेंगुर्ला- 78 टक्के देवगड - 75 टक्के कोल्हापूर  इचलकरंजी – 76.67 टक्के जयसिंगपूर – 77.66 टक्के कुरुंदवाड –  85.8 टक्के पेठवडगाव –  87.59 टक्के मलकापूर –  86.11 टक्के पन्हाळा – 92.84  टक्के कागल –  87.51 टक्के मुरगूड –  90.13 टक्के गडहिंग्लज – 80.3  टक्के सरासरी  79.39 टक्केवारी अहमदनगर शिर्डी नगरपंचायत – 83 टक्के राहाता – 83.75 टक्के श्रीरामपुर – 75 टक्के कोपरगाव  – 74.56 टक्के संगमनेर – 74.26 टक्के वाशिम वाशिम- 65.16 टक्के मंगरुळपिर- 65.13 टक्के कारंजा- 61.89 टक्के जालना जालना 54 टक्के अंबड 75.1 टक्के भोकरदन 72.56 टक्के परतूर 76.46 टक्के सरासरी 69.53 टक्के यवतमाळ  उमरखेड : 66.33 टक्के दारव्हा : 70.73 टक्के आर्णी : 68.11 टक्के घाटंजी : 75.62 टक्के चंद्रपूर बल्लारपूर 66  टक्के मूळ  68.78 टक्के वरोरा 63.96  टक्के राजुरा 71 टक्के सरासरी 67.43 टक्के वर्धा आर्वी  61.72 टक्के पुलगाव 66.43 टक्के सिंदी रेल्वे 80.33 टक्के बीड बीड – 64.13 टक्के अंबेजोगाई – 76.53 टक्के परळी – 68.6 टक्के माजलगाव – 75.61 टक्के गेवराई – 78.71 टक्के धारुर – 73.67 टक्के सरासरी 69.88 टक्के परभणी सोनपेठ – 80.30 टक्के पाथरी – 76.87 टक्के गंगाखेड – 58.91 टक्के पूर्णा – 74.29 टक्के मानवत -78.17 टक्के सेलू -73.33 टक्के सोलापूर करमाळा 78.25 टक्के दूधनी 72.30 टक्के बार्शी 73 टक्के कुर्डुवाडी 73.08 टक्के मंगळवेढा 76.57 टक्के अक्कलकोट 71.67 टक्के मैंदर्गी 74 टक्के जालना जालना 54 टक्के अंबड 75.1 टक्के भोकरदन 72.56 टक्के परतूर 76.46 टक्के सरासरी 69.53 टक्के बुलडाणा देवुलगाव राजा 73.25 टक्के बुलढाणा 54.40 टक्के मलकापुर 69.33 टक्के नांदुरा 79.23 टक्के शेगाव 74.73 टक्के मेहकर 70.71 टक्के जळगाव जामोद 69.11 टक्के खामगांव 71 टक्के टक्के
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
जोडी बना दो यार.. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय क्रिकेटर शुभमन गिलला डेट, म्हणाली.. ,
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Embed widget