एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
LIVE: नगरपालिका निवडणूक: कुणाची कुठे सत्ता, कुणाचे किती नगराध्यक्ष?
![LIVE: नगरपालिका निवडणूक: कुणाची कुठे सत्ता, कुणाचे किती नगराध्यक्ष? Nagarpalika Election Result Details LIVE: नगरपालिका निवडणूक: कुणाची कुठे सत्ता, कुणाचे किती नगराध्यक्ष?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/28180734/NIKAL_WEB-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपरिषद व 18 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि थेट नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्यात आला.
राज्यात आतापर्यंत भाजपचे सर्वाधिक 52 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत. राज्यामध्ये 25 ठिकाणी शिवसेनेचे, काँग्रेसचे 22 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 17 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. 30 जागांवर इतर पक्षातले किंवा अपक्ष नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
या निवडणुकीमध्ये अनेक प्रस्थापितांना हादरे बसले, अनेक ठिकाणी सत्तांतरं झाली आहेत. नगरपालिकांबाबत जर बोलायचं झालं भाजपा 31 नगरपालिकांमध्ये सत्ता स्थापन करताना बघायला मिळत आहेत. तर काँग्रेस 20 नगरपालिकांमध्ये सत्तास्थानी विराजमान होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 17 ठिकाणी तर शिवसेना 16 ठिकाणी तर स्थानिक आघाड्या 28 ठिकाणी सत्ता स्थापन करतील. 34 ठिकाणी मात्र त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.
नगराध्यक्ष कुणाचे किती:
भाजपचे 52 नगराध्यक्ष
शिवसेनेचे 25 नगराध्यक्ष
काँग्रेसचे 22 नगराध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसचे 17 नगराध्यक्ष
30 अपक्ष नगराध्यक्ष
पाहा निकाल: माझा जिल्हा, माझी नगरपालिका
किती नगरपालिकांमध्ये कुणाची सत्ता: 31 नगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता 20 नगरपालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता 17 नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता 16 नगरपालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता 28 नगरपालिकांमध्ये स्थानिक आघाड्यांची सत्ता 34 नगरपालिकांमध्ये त्रिशंकू अवस्थाअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)