एक्स्प्लोर
दोन रुपयांच्या पतंगासाठी 13 वर्षीय मुलाची हत्या
सहाव्या इयत्तेत शिकणारा अभिषेक टेकाम हा 13 ऑक्टोबरपासून घरातून बेपता होता.
यवतमाळ : सहावीत शिकणाऱ्या मुलाच्या हत्येचा उलगडा झाला आहे. अवघ्या 2 रुपयांच्या पतंगासाठी अभिजीत टेकाम या 13 वर्षीय मुलाची हत्या झाल्याचं पोलिस तपासात समोर आले आहे. यवतमाळ शहराच्या सुरज नगर भागात अभिजत आपल्या कुटुंबासोबत राहत होतो.
यवतमाळ शहरातील सूरज नगर परिसरातील सागवान जंगल परिसरात एका निर्जन स्थळी त्याचा मृतदेह आढळला होता. घटनेच्या दिवशी अभिजित त्या भागात उडत आलेल्या पतंगाचा पाठलाग करत तिथे गेला होता. तिथेच पूर्वीपासून बसून असलेल्या अल्पवीयन तीन मुलांशी त्याचा वाद झाला आणि याच वादातून त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली.
सहाव्या इयत्तेत शिकणारा अभिषेक टेकाम हा 13 ऑक्टोबरपासून घरातून बेपता होता. घरातून शिकवणीला गेला होता. मात्र उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या पालकांची चिंता वाढली. पालकांनी शिकवणी परिसरात मित्र आणि नातेवाईकांकडे विचारपूस केली आणि सर्वत्र शोधाशोध केली असता तो आढळला नाही.
त्यानंतर त्याचे वडील दीपक टेकाम यांनी यवतमाळच्या वडगावरोड पोलिसात अपहरणाबाबत तक्रार दाखल केली होती आणि दुसया दिवशी त्याचा मृतदेह सुरज नगरातील सागवान जंगलात आढळला.
घटनास्थळी पोलिसांना व्यसनासाठी वापरल्या जाणारे फेविकॉल एसआर 988 हे सापडले होते. अभिजितच्या हत्येचा पोलिसांनी शोध घेताना 150 पेक्षा जास्त मुलांची पोलिसांनी चौकशी केली. त्यातील अनेक मुले व्यसन करीत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement