एक्स्प्लोर
Advertisement
जळगावमध्ये महाविद्यालयात धक्का लागल्याच्या वादातून तरुणाचा भरदिवसा खून
यावेळी झालेल्या भांडणात काही तरुण जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.
जळगाव : येथील एम.जे. महाविद्यालयात एका तरुणाचा भरदिवसा खून करण्यात आला आहे. मृत युवक आपल्या भावासह महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी आला होता. त्याचवेळी पार्किंगमध्ये ट्रिपल सीट आलेल्या तरुणांना धक्का लागला. यातून वाद इतका वाढला की आरोपींनी तरुणाचा चॉपरने वार करून खून केला.
दरम्यान यावेळी झालेल्या भांडणात काही तरुण जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.
जळगाव नजीकच्या असोदा येथील मुकेश उर्फ बंटी मधुकर सपकाळे हा मूजे महाविद्यालयात तृतीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठी कागदपत्रे घेवूनआला होता. यावेळी त्याचा सेवा सुविधा केंद्राचे काम करणारा भाऊदेखील सोबत आला होता.
यावेळी मुकेशचा भाऊ रोहित याच्या दुचाकीचा तीन तरुणांना धक्का लागल्याने त्यांच्यात वाद झाला. त्याच तीन युवकांनी मुकेश आणि रोहित यांना मारण्यासाठी 20 ते 25 गुंड बोलावले. त्या सर्वांनी दोन्ही भावांना बेदम मारहाण केली. त्याच दरम्यान मुकेशचे देखील मित्र पोहोचले. यावेळी झालेल्या हाणामारीत एकाने मुकेशच्या छातीत चॉपरने वार केले.
यात मुकेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, या हाणामारीत जखमी झालेल्या इतरांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली. तसेच पुढील तपास रामानंद नगर पोलीस करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
अहमदनगर
निवडणूक
Advertisement