'मुंबईत रुग्णसंख्या कमी होत असली, तरी राज्यात धोका कायम, काळजी घेणं अनिवार्य,' टास्क फोर्सच्या तज्ज्ञांच्या सूचना
वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसात मुंबईत कोरोनारुग्णसंख्येचा स्फोट होत होता. पण मागील 2-3 दिवसांपासून रुग्णसंख्या काहीशी कमी होत असल्याने प्रशासन आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
!['मुंबईत रुग्णसंख्या कमी होत असली, तरी राज्यात धोका कायम, काळजी घेणं अनिवार्य,' टास्क फोर्सच्या तज्ज्ञांच्या सूचना Mumbais Corona Patient Decreasing but in State Count is High So taking care from Corona is Must 'मुंबईत रुग्णसंख्या कमी होत असली, तरी राज्यात धोका कायम, काळजी घेणं अनिवार्य,' टास्क फोर्सच्या तज्ज्ञांच्या सूचना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/17/b63f09699f9c4d6febe599aa205e8b15_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : जागतिक महामारी असणाऱ्या कोरोनाने मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जगात थैमान घातले आहे. भारताही अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून महाराष्ट्राचा विचार करता पहिली लाट त्यानंतर दुसरी आता तर पुन्हा तिसऱ्यांदा रुग्णसंख्या कमालीची वाढताना दिसत आहे. पण यंदा झपाट्याने वाढलेली मुंबईतील रुग्णसंख्या काही दिवसांतच कमी देखील होऊ लागली आहे. पण दुसरीकडे राज्यात मात्र रुग्ण झपाट्याने सापडत असल्याने टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी मुंबईकरांसह राज्यातील सर्वांनी काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण राज्यातून नागरिकांची सर्वाधिक ये-जा मुंबईतच असल्याने रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी नियम पाळणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले.
काय म्हणाले डॉ. पंडित?
मुंबईतील कमी होणारी रुग्णसंख्या यावर बोलताना डॉ. पंडित म्हणाले, 'मुंबईतील रुग्ण संख्या कमी होत असली, तरी महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण संख्या ही वाढती आहे. त्यात मुंबई महाराष्ट्राची राजधानी असल्याने येथे मोठ्या संख्येने लोकांचा येणे-जाणे असते. त्यामुळे आपल्याला अजूनही कोणताही निर्णय घेण्याआधी वाट पाहणे गरजेचे आहे. खरंच रुग्ण संख्या कमी होत आहे की हा फक्त एक इनिशियल ट्रेंड होता? याचा विचार करावा लागेल. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या जोपर्यंत वाढत आहे, तोपर्यंत कोरोनाची तिसरी लाट सुरू आ,हे असं समजून सर्व नियम, निर्बंध पाळले पाहिजे.'
'वयोवृद्ध रुग्णांनी अधिक काळजी घ्या'
डॉ. पंडित यांनी वयोवृद्ध रुग्णांबद्दल बोलताना ते म्हणाले, 'जे वयोवृद्ध रुग्ण आहेत ज्यांना कॅन्सर, ट्रान्सप्लांट, हृदय विकार आणि इतर आजार आहेत अशांना कोरोना झाल्यानंतर ओमायक्रोन हे सौम्य लक्षण आहे असं समजू नका. कोरोना झाल्यानंतर वेळोवेळी वैद्यकीय अधिकारी असेल फॅमिली फिजिशियन असतील यांच्याशी बोलून काय काळजी घ्यायला हवी? याबाबत वेळोवेळी सल्ला घ्या.'
हे ही वाचा-
- मुंबईने तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू ओलांडला, टास्क फोर्स तज्ज्ञांचे अनुमान; सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्येत घट
- Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा! नव्या बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या तिप्पट
- Maharashtra Corona Update : राज्यात रविवारीही 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)