एक्स्प्लोर

मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी

mumbai weather: त्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईत थंडीचा जोर वाढल्याचं सांगण्यात येत असून येत्या 24 तासांत मुंबईकरांना हुडहुडी भरणार आहे. 

Mumbai Weather: ऐन थंडीत गेल्या काही दिवसात अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते. आधीच दमट वातावरण असणाऱ्या मुंबईनगरीत तापमान अधिकच वाढल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण होत घामानं डबडबले होते. पण आता शेवटी मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागल्याचं दिसतंय. गेल्या 9 वर्षांतल्या सर्वात कमी तापमानाची मुंबईत नोंद झाली आहे. मुंबईतल्या सांता्क्रूज केंद्रावर आज 13.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.यापूर्वी डिसेंबर 2015 मध्ये किमान तापमान 11.4 अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले होते.

उत्तरेकडील राज्यांमध्ये वादळी थंड वारे वाहत आहेत. पंजाब, हरियाणामध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. तर राजस्थानमध्ये थंडीची लाट असल्याने महाराष्ट्रात कोरडे व थंड वारे वाहत आहेत.उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईत थंडीचा जोर वाढल्याचं सांगण्यात येत असून येत्या 24 तासांत मुंबईकरांना हुडहुडी भरणार आहे. 

मुंबई महाबळेश्वरपेक्षाही थंड?

थंड हवेच्या ठिकाणांपैकी असणाऱ्या महाबळेश्वरपेक्षाही आज मुंबईत कमी तापमानाची नोंद झाली आहे. गारठा वाढला असून गेल्या नऊ वर्षातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद मुंबईत झालीय.मुंबईतील सांताक्रुज केंद्रावर तापमान 13.7 अंश सेल्सिअसवर होते. तर कुलाब्यातही १९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये किमान तापमान 15 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

येत्या 24 तासांत थंडीचा जोर वाढणार

मुंबईकरांना आता कपाटात ठेवलेले स्वेटर कानटोप्या बाहेर काढाव्या लागणार आहेत. मुंबईत आज 9 वर्षांतल्या निचांकी तापमानाची नोंद झाली असून गारठ्यानं मुंबईकरांचे दात वाजू लागले आहेत. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मुंबईसह नाशिक, पुण्यात येत्या 24 तासांत थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. 

नाशिक, पुण्यातही कडाका वाढला

ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे तापमानात वाढ झाली होती. नाशिक शहरात पारा 9.4 अंशावर तर निफाड मध्ये 6.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. अवकाळी पावसामुळे गेल्या आठवड्यात थंडी गायब झाली होती. आता पुन्हा तापमानात घट झाल्याने थंडीत वाढ झाली आहे. येत्या 5 दिवसात पुणेकरांना प्रचंड गारठ्यात रहावं लागणार आहे. भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी X माध्यमावर याविषयी पोस्ट केली आहे. पुण्यात तापमानात येत्या पाच दिवसात कसे हवामान असणार याचा अंदाज वर्तवलाय. आज पुण्यात 13 ते 14 अंश तापमानाची नोंद केली जाण्याचा अंदाज आहे. तर येत्या काही दिवसात तापमान 11 अंशांवर जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

US Visa Rules: 'मधुमेह असणाऱ्या कोट्यवधी भारतीयांना धोका?', जाणून घ्या अमेरिकेचे नवे व्हिसा नियम
Snake Rescuer Dies: 'साप पकडताना हाताला चावला', प्राणीमित्र Sameer Hingle यांचा दुर्दैवी मृत्यू
Omkar Elephant: ओंकार हत्तीवर पुन्हा हल्ला, आता फेकले सुतळी बॉम्ब
Whel Theft: बीडमध्ये मोठी कारवाई, सोन्याहून महाग दीड कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त, दोघे अटकेत
Dowry Harassment: सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या? घराबाहेरच अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Asia Cup Trophy : आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Gold : सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
Embed widget