मुंबई महापालिका कचरा घोटाळा प्रकरण! मनसे आक्रमक, पालिका आयुक्तांसमोरच घातला गोंधळ
मुंबई महानगर पालिकेच्या कचरा घोटाळा प्रकरणावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Mumbai Municipal Corporation MNS News : मुंबई महानगर पालिकेच्या कचरा घोटाळा प्रकरणावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या कचरा घोटाळ्याविरोधात मनसेने आज महापालिकेच्या आयुक्त भूषण गगराणी यांच्यासमोरच गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेत कचरा घोटाळा होत असल्याबाबतची माहिती समोर आणली होती. यानंतर आज मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
आयुक्तांच्या सुरु असलेल्या बैठकीत जाऊन घातला गोंधळ
आयुक्तांकडे वारंवार भेटीसाठी वेळ मागूनही भेट मिळत नसल्याने आज माजी नगरसेवकांसह संतोष धुरी आणि कामगार सेना सरचिटणीस केतन नाईक यांनी आयुक्तांच्या सुरु असलेल्या बैठकीत जाऊन गोंधळ घातला. यावेली आयुक्त भूषण गगराणी यांनी या टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली नसून लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, मुंबई कचरा संकलनामध्ये 3 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप देखील करम्चाऱ्यांनी केला आहे. वर्षानुवर्षे ठरलेल्याच 14 कंपन्यांन्याच कंत्राट दिले जाते. वारंवार एकाच कंपन्यांना कंत्राट देण्यामेग राजकीय वदहस्त असल्याचा आरोप देखील कर्मचाऱ्यांनी केली होता.
संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत कचरा घोटाळा होत असल्याबाबतची माहिती समोर आणली
कचरा कर्मचाऱ्यांनी आरोप करुन देखील अधिकारी मात्र यावार बोलायला तयार नाहीत. त्यामुळं यावर अधिकारी गप्प का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. सध्या धोकादायक गाड्यांमध्ये कचरा नेला जात आहे. तसेच यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. आता यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेत कचरा घोटाळा होत असल्याबाबतची माहिती समोर आणली होती. यानंतर आज मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
पुढच्या काळात जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे. सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आणखी काही नगरपंचायत आणि नगरपरिषदांसाठीची मतदान प्रक्रिया 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या सर्व निवडणुकांचे एकत्रित निकाल हा 21 डिसेंबर रोरी लागणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरु झाल्याचे चित्र पाहा.ला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:























