एक्स्प्लोर

मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱ्याचा प्रताप! 18 अधिकाऱ्यांची केली 2 कोटी 61 लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल  

मंत्रालयातील सेवानिवृत्त उपसचिव अधिकाऱ्याने मुंबईतील 18 राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची तब्बल 2 कोटी 61 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Mumbai crime news : मंत्रालयातील सेवानिवृत्त उपसचिव अधिकाऱ्याने मुंबईतील (Mumbai) 18 राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची तब्बल 2 कोटी 61 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पवईच्या हिरानंदानी परिसरात ब्लू बेल इमारत येथील शासकीय कोट्यामधील निवासस्थाने नावावर करुन देतो, असे खोटे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. राजेश शालिग्राम गोवील ( Rajesh Shaligram Govil) असं मंत्रालयातील सेवानिवृत्त उपसचिव अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तब्बल 2 कोटी 61 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक 

मंत्रालयातील सेवानिवृत्त उपसचिव अधिकारी राजेश शालिग्राम गोवीलने मुंबई येथील 18 राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची 2 कोटी 61 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत पवई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 1686 ला हिरानंदानी बिल्डर, राज्य सरकार व एमएमआरडीए यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. त्यानुसार हिरानंदानी, पवई येथील काही जागा राज्य सरकारने हिरानंदानी बिल्डरला विकासासाठी दिली होती. त्याबदल्यात हिरानंदानी बिल्डर हे हिरानंदानी पवई येथील 1296 सदनिका राज्य सरकारला देणार होते. याबाबत दाखल जनहित याचिका बाबत न्यायालयाने 2012 साली निर्णय देताना हिरानंदानी बिल्डरने दिलेल्या सदनिका राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 135 रुपये प्रति चौरस फूट दराने विक्री कराव्यात असे आदेश दिले होते. 

सदनिका नावावर करुन देतो असं खोटं अमिष दाखवून फसवणूक

नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी असलेले राजेश गोविल यांनी या 18 शासकीय कर्मचाऱ्यांना सदरच्या सदनिका नावावर करुन देतो, असे आमिष दाखवले. आपल्याला न्यायालयात लढावे लागेल व माझ्या ओळखीने हे सर्व प्रकरण मी करुन देतो म्हणून तब्बल 2 कोटी 61 लाख रुपयांना कर्मचाऱ्यांना गंडवले आहे. या कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी 10 ते 15 लाख रुपये 2021 पर्यंत टप्याटप्याने गोविल यास दिले आहेत. मात्र त्याने दिलेली मुदत संपूनही सदनिका नावावर झाल्या नाहीत तसेच गोविल याने पैसे परत देण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार घडला. त्यामुळं फसवणूक झालेले अधिकारी सावध झाले. त्या सर्व फसवणूक झालेल्याअधिकाऱ्यांनी याबाबत पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पवई पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Nashik Crime: धक्कादायक! GST च्या कर्मचाऱ्याकडून कोट्यवधीची फसवणूक, नाशिकमधील एकाने चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेचे पहिले वृद्धाश्रम; गोरेगाव पूर्व येथे लवकरच लोकार्पण
Maharashtra Live blog updates: मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेचे पहिले वृद्धाश्रम; गोरेगाव पूर्व येथे लवकरच लोकार्पण
Pune Crime News : तू खूप सुंदर दिसतेस म्हणत हात पकडला अन्....; डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; शिवाजीनगर परिसरातील संतापजनक घटना
तू खूप सुंदर दिसतेस म्हणत हात पकडला अन्....; डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील संतापजनक घटना
Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
LPG Gas Shortage: केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameria Israel Iran War live Update: युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल
शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
Ind vs Nz Final Pitch Report : भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
Arjun Tendulkar : लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
लेकाने सीफेसिंग फ्लॅट विकला, 15 दिवसातंच बिग बींची आयोध्येत मोठी गुंतवणूक; रामजन्मभूमीत किती कोटींची डील?
लेकाने सीफेसिंग फ्लॅट विकला, 15 दिवसातंच बिग बींची आयोध्येत मोठी गुंतवणूक; रामजन्मभूमीत किती कोटींची डील?
Vishwas Patil : ‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, कोरेगाव भीमा आयोगासमोर विश्वास पाटील यांची कबुली
‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, कोरेगाव भीमा आयोगासमोर विश्वास पाटील यांची कबुली
30 लाखांची मर्सिडीज अन् अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात एन्ट्री; मराठी अभिनेत्रीचं मुंबई इंडियन्सशी खास नातं
30 लाखांची मर्सिडीज अन् अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात एन्ट्री; मराठी अभिनेत्रीचं मुंबई इंडियन्सशी खास नातं
Embed widget