एक्स्प्लोर
मुंबईतील 6 मार्चचा मराठा क्रांती मोर्चा तूर्तास स्थगित !
मुंबई : मुंबईतील 6 मार्चचा नियोजित मराठा क्रांती मूक मोर्चाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. याच काळात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने मोर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभर मराठा क्रांती मूक मोर्चे झाले. मुंबईतही 6 मार्चला मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते. मात्र, शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने मोर्चा काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मराठा मोर्चाच्या विनोद पोखरकर यांनी दिली.
मराठा क्रांती मूक मोर्चाच्या दिवशीचा पेपरला सुट्टी देऊन पेपर पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारला विनंती केली असता, सरकारने सहकार्य केले नाही, म्हणून तूर्तास मुंबई मोर्चाची तारीख रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती विनोद पोखरकर यांनी दिली.
दरम्यान, मुंबईमध्ये लवकरच राज्यव्यापी बैठक घेऊन मुंबईतील मोर्चाची पुढील तारीख जाहीर करण्यात येईल, असेही विनोद पोखरकर यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement