एक्स्प्लोर
MPSC उमेदवारांनो, प्रोफाईल तातडीने आधार कार्डशी लिंक करा!
आधार क्रमांकाशी न जोडणाऱ्यांचं प्रोफाईल निष्क्रिय (Deactivate) करण्यात येणार आहे.
मुंबई: राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा देणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे.
ज्या उमेदवारांनी आपल्या प्रोफाईलमध्ये आधार क्रमांक नमूद केला नसेल, किंवा आपलं प्रोफाईल आधार क्रमांकाशी जोडलं नसेल, त्यांनी तातडीने जोडून घ्यावं. त्यासाठी 31 मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा त्यांचं प्रोफाईल 1 जून 2018 पासून निष्क्रिय (Deactivate) करण्यात येणार आहे.
आधार क्रमांकाशी न जोडणाऱ्यांचं प्रोफाईल निष्क्रिय (Deactivate) करण्यात येणार आहे.
MPSC परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी, आयोगाने मार्च 2017 पासून आधार कार्ड तपशील लागू केला आहे. आता या निर्णयाला वर्ष होऊन गेलं आहे. मात्र ज्यांचे जुने प्रोफाईल आहेत त्यांनी अजूनही आधार कार्डचे तपशील अपडेट केले नाहीत. त्यामुळे आता आयोगाने थेट असे प्रोफाईल डिअॅक्टिव्हेट करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रोफाईल निष्क्रिय केल्यानंतर संबंधित उमेदवार लॉग इन करुन प्रोफाईल पाहू शकेल, पण त्याला त्या प्रोफाईलवरुन कोणतेही अर्ज करु शकणार नाही.
#MPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना... उमेदवारांनी ३१ मे पूर्वी आपल्या प्रोफाईलमध्ये @UIDAI #आधार नोंदणी क्रमांक समाविष्ट न केल्यास १ जूनपासून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा निष्क्रिय (Deactivate) करणार. pic.twitter.com/HwzVcLwZ7v
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 7, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement