Morning Headlines 27th July : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
पक्ष नाही, नाव, चिन्ह चोरलं तरीही माझी भीती वाटते?, उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray Interview : "आज अख्खा भाजप माझ्याविरुद्ध आहे," असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पक्ष, नाव, चिन्ह चोरलं, तरी देखील तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती वाटते असा सवाल विचारत उद्धव ठाकरे ही एकटी व्यक्ती नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत, असा दावा त्यांनी केला. 'आवाज कुणाचा' या पॉडकास्ट मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली असून आज (27 जुलै) मुलाखतीचा दुसरा आणि अखेरचा भाग प्रकाशित झाला आहे. वाचा सविस्तर
गेल्या 5 वर्षांत तब्बल 32 हजार विद्यार्थ्यांनी मध्येच शिक्षण सोडलं
Higher Education Student : देशात उच्च शिक्षणात प्रवेश घेतल्यानंतर मध्येच शिक्षण सोडून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या पाच वर्षांची आकडेवारी लक्षात घेता 2019 ते 2023 पर्यंत शिक्षण मंत्रालयाने सादर केलेली आकडेवारी फारच आश्चर्यकारक आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील नामांकित संस्थांमध्ये शिकणाऱ्या 32 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण मध्येच सोडलं आहे. यामध्ये आयआयटी (IIT), एनआयटी (NIT), आयआयएम (IIM) यांसारख्या संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यसभेतील शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यातील निम्म्याहून अधिक विद्यार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास जातीतील आहेत. वाचा सविस्तर
हवाई दलाच्या जवानासाठी एयर फोर्सच्या विमानानं नागपूरहून मानवी हृदय एयरलिफ्ट; पुण्यात हृदय प्रत्यारोपण यशस्वी
India Air Force : हवाई दलाच्या विमानानं बुधवारी (26 जुलै) सकाळी एक मानवी हृदय नागपूरहून पुण्याला पाठवण्यात आलं. हवाई दलाच्या जवानाच्या हृदय प्रत्यारोपणासाठी हे हृदय पुण्याला आणण्यात आलं. त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. संरक्षण विभागाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात यासंदर्भात ही माहिती देण्यात आली आहे. वाचा सविस्तर
PM किसानचा चौदावा हप्ता आज शेतकऱ्यांना मिळणार, राजस्थानमधून पंतप्रधानांच्या हस्ते वितरण होणार
PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत चौदावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत केला जाणार आहे. एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीचा देय लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. राजस्थानमधील सीकर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन समारंभाद्वारे PM किसानचा चौदावा हप्ता वितरीत केला जाणार आहे. याबाबतची माहिती विस्तार व प्रशिक्षण कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली आहे. वाचा सविस्तर
'विकसित देशांच्या यादीमध्ये लवकरच भारताचा समावेश होणार'; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य
PM Modi Speech : आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तसेच भारत लवकरच विकसित देशांच्या यादीमध्ये सामील होणार असल्याचं वक्तव्य देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बुधवारी (26 जुलै) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या प्रगती मैदानावर जागतिक संमलेन आणि प्रदर्शन केंद्र भारत मंडपमचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. वाचा सविस्तर
आज राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार पंतप्रधान मोदी; का आहे हे विमानतळ खास?
Rajkot International Airport : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (27 जुलै) गुजरातमधील राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत. एएनआय न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी राजकोटच्या ग्रीनफिल्ड विमानतळाचं आज उद्घाटन करणार आहेत. त्यांनी बुधवारी (26 जुलै) बोलताना सांगितलं की, "हे विमानतळ खूप मोठं आणि सुंदर आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे की, पंतप्रधान मोदी या विमानतळाचं उद्घाटन करतील आणि ते गुजरातच्या लोकांना समर्पित करतील." वाचा सविस्तर
मेष, कर्कसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; जाणून घ्या सर्व 12 राशींचं राशीभविष्य
Horoscope Today 27 July 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांनी वाहन चालवताना काळजी घेणं गरजेचं आहे. कर्क राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्या. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा गुरुवार नेमका कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर
'मिसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम कालवश, गब्बर सिंगची भूमिका आजरामर करणाऱ्या अमजद खान यांचे निधन; आज इतिहासात
27th July In History: इतिहासात आजच्या दिवसाला मोठं महत्त्व आहे. भारताचे मिसाईल मॅन अशी ज्यांची ओळख आहे त्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) यांचे निधन आजच्याच दिवशी झालं. शास्त्रज्ञ, अभियंता, राष्ट्रपती अशी कामगिरी करणाऱ्या अब्दुल कलामांचे कार्य हे भारतातील तरूणांसाठी कायम प्रेरणादायी असेल. आजच्याच दिवशी अभिनेते अमजद खान यांचेही निधन झालं होतं. वाचा सविस्तर