एक्स्प्लोर

Morning Headlines 16th April : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

काळजी घ्या! मुंबई, ठाणेसह रायगडमध्ये उष्णतेची लाट; विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) तर कुठे उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणेसह रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता अद्यापही कायम आहे. वाचा सविस्तर...

Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरण; दोघांच्या भूजमधून मुसक्या आवळल्या, कोण आहेत आरोपी?

Salman Khan House Firing Case :  बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने गुजरात मधील भूज येथून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विक्की गुप्ता आणि सागर पाल अशी आरोपींची नावे आहेत. वाचा सविस्तर...

फडणवीसांकडून आमदारकीची ऑफर, उत्तम जानकर काय भूमिका घेणार? 19 एप्रिलला निर्णय जाहीर करणार

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Election 2024) रोज नवनवीन घडामोडींचा वेग येत असताना आता नागपूर येथे खास विमानाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आलेले उत्तम जानकर (Uttam Jankar) यांना थेट आमदारकीची ऑफर देण्यात आली. फडणवीसांनी आमदारकीची ऑफर देऊन देखील उत्तम जानकर भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार नसल्याचे त्यांनी सांगितल्याने भाजपच्या अडचणी कायम आहेत. वाचा सविस्तर...

Sangli Lok Sabha : विशाल पाटलांची बंडखोरी, मविआची डोकेदुखी वाढली; सांगलीत आज मोठं शक्तिप्रदर्शन

Sangli Lok Sabha: सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी सांगलीत चंद्रहार पाटलांची (Chandrahar Patil) उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये (Congress) तीव्र नाराजीची लाट उसळली . त्यातच आता सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी (Vishal Patil) अखेर सांगली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्याचबरोबत काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आज  विशाल पाटील सांगलीत मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे. वाचा सविस्तर...

Nashik Swine Flu : नाशिककरांची चिंता वाढली, पुन्हा स्वाईन फ्लूचा धोका वाढला, एकाचा मृत्यू तर दोघांवर उपचार सुरू

Nashik News:   'स्वाइन फ्लू'ने (Swine Flu)  (H1N1) नाशिककरांची चिंता वाढवली आहे.   शहरासह जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिकमध्ये  स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले तर एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू देखील झाला आहे. यामुळे आरोग्य प्रशासन आता अलर्ट मोडवर असून जिल्ह्यात स्वाईन फ्लू रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. वाचा सविस्तर...

पाचवीही मुलगीच झाली, आई-वडिलांनी कट रचला; चौथीची जिभ कापली, पाचवीची हत्या करुन मृतदेह पुरला, मुंब्र्यातील भयावह घटना

Mumbra Crime:  दोन मुले आणि तिसऱ्या मुलीनंतरही आणखी दोन मुली झाल्याने 18 महिन्याच्या मुलीची (Mumbra Crime)   हत्या केली आणि तिचा मृतदेह पुरला. तर दुसऱ्या मुलीची जीभ कापणाऱ्या आई नुरानी जाहीद शेख (28), वडील जाहीद सलामत शेख (38) याना मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या नराधमांनी पाचवीही मुलगी झाल्याने आणि आजारी असल्याने मुलीची हत्या केल्याची आणि तिचा मृतदेह पुरल्याची कबुली दिली. वाचा सविस्तर...

Crime News : छेडछाडीला कंटाळून आठवीतील शाळकरी मुलीचं टोकाचं पाऊल, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

बीड : छेडछाडीला कंटाळून आठवीच्या वर्गातील मुलीचं टोकाचं पाऊल उचलल्यची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलांकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आपल्या मुलींने टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. वाचा सविस्तर...

RCB vs SRH: 549 धावा, 38 षटकार, 81 चौकार; आरसीबी अन् हैदराबादच्या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद

RCB vs SRH: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात  एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल 2024 च्या हंगामातील 30 वा सामना खेळला गेला. या सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. वाचा सविस्तर...

Horoscope Today 16 April 2024 : आजचा मंगळवार खास! बाप्पाच्या कृपेने 'या' राशींच्या सर्व समस्या सुटणार; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 16 April 2024 : पंचांगानुसार, आज 16 एप्रिल 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. चैत्र महिन्याचा आठवा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा मंगळवारचा दिवस  कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM: 13 May 2024: ABP MajhaAmol Kolhe Shirur Lok Sabha :आचारसंहिता धाब्यावर बसवायची असेल तर, इतका बडगा कशासाठी?, कोल्हेंचा सवालABP Majha Headlines : 01 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSaleel Kulkarni : सुप्रसिद्ध गायक, संगीतकार सलील कुलकर्णींनं लेकासोबत बजावला मतदानाचा हक्क : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Devendra Fadnavis: फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट पचवला, ते असेपर्यंत महाराष्ट्राच्या केसालाही धक्का लागू शकत नाही: आचार्य नयपद्मसागरजी महाराज
फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट पचवला, ते असेपर्यंत महाराष्ट्राच्या केसालाही धक्का लागू शकत नाही: आचार्य नयपद्मसागरजी महाराज
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
स्वत:च लाटली गोल चपाती, लंगरसेवाही दिली; डोक्यावर पगडी, मोदींनी गुरुद्वारात टेकला माथा
Embed widget