एक्स्प्लोर

Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

Jalgaon train accident काही वर्षांपूर्वी मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्टेशनवर देखील अशाच अफेवतून मोठा अपघात झाला होता. कुणीतरी फूल पडलं असं म्हटलं, अन् पुल पडला... अशी अफवा पसरली.

Jalgaon train accident जळगाव : बंगळुरू एक्सप्रेसच्या धडकेत जळगावजवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ (Railway) 8 ते 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना घडली. न घडलेल्या घटनेच्या अफवेने क्षणात घात केला अन् 8 ते 10 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. जळगावहून (jalgaon) मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसच्या खाली चिरडल्याची या प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला. जळगावमधील परधाडे स्टेशनजवळ हा भीषण अपघात घडला असून रेल्वे पटरीजवळ प्रवाशांचे मृतदेह पडल्याचं पाहायला मिळालं. या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ होत असून केवळ एका अफवेनं घात गेला अन् क्षणात 8 ते 10 कुटुंबीयांवर मोठं दु:ख कोसळलं. अपघातानंतर ट्रेन रेल्वे स्थानकावर थांबली असून प्रवाशांनी खाली उतरुन मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. 

राजधानी मुंबईत काही वर्षांपूर्वी प्रभादेवी रेल्वे स्टेशनवर देखील अशाच अफेवतून मोठा अपघात झाला होता. रेल्वे स्थानकावरील पुलावरुन जात असताना कुणीतरी फूल पडलं असं म्हटलं, अन् पुल पडला... अशी अफवा पसरली. या अफवेनंतर स्थानकावर मोठी चेंगराचेंगरी झाली अन् तब्बल 23 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. केवळ अफवेतून 2017 मध्ये झालेल्या या दुर्घटनेची आठवण करुन देणारी जळगावची रेल्वे दुर्घटना आहे. कारण, इथेही एका अफवेनंच 8 ते 10 जणांचा बळी घेतल्याचं पाहायला मिळालं.    

अफवेनं केला घात, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

जळगावहून मुंबईकडे एक्सप्रेस निघाली होती, पोचाराजवळी परधाडे स्थानकाजवळ ट्रेन आली असता ब्रेक दाबल्यानंतर घर्षण होऊन ठिणग्या उडतात, तशा ठिणग्या उडाल्या होत्या. मात्र, तेव्हा ट्रेनमधील एका प्रवाशाने आग लागली, आग लागली असं बोलल्यामुळे रेल्वेतील काही प्रवाशांनी चैन ओढल्यानंतर रेल्वे थांबली. त्याचवेळी, ट्रेनमधून काही प्रवाशांनी उड्या मारल्या. दुर्दैवाने त्याचवेळी दुसऱ्या बाजुने कर्नाटकडे जाणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसखाली चिरडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अंदाजे 9 ते 10 लोकं रेल्वेखाली चिरडल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे. रेल्वेच्या एकाच डब्यातील लोकांनी ह्या उड्या मारल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. मात्र, कानावर पडलेल्या दोन शब्दांची कुठलीही खात्री न करता, संयम न बाळगता, घाईघाईने प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या अन् नाहक जीव गमावला. त्यामुळे, एका अफवेनं घात केला अन् होत्याचं नव्हतं झालं. दरम्यान, जळगावमधील आरपीएफ जवान, रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. रेल्वे प्रशासनही घटनास्थळी पोहोचलं असून घटनेचा पंचनामा व मदतकार्य सुरू करण्यात आला आहे. 

मंत्री महाजन व गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

जळगाव टीमचा मला फोन आला, मी लगेच तिकडे निघालो असून 10 ते 12 जण या अपघातात दगावल्याची माहिती आहे. ही घटना खूप दुर्दैवी असून घटनेसंदर्भातील माहिती प्रत्यक्षदर्शी गेल्यावरच मिळेल. अपघातातील जखमींना मदत व उपाचारासाठी सर्वतोपरी काम केले जाईल. पाचोऱ्यापासून 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर ही घटना घडली असून तेथील रुग्णालयात जखमींवर उपचार केले जातील, त्यासाठीची तयारी रुग्णालयाकडून करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. जळगावचे नेत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना घटनेची माहिती दिली. मी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बोललो असून रेल्वे स्थानकावर ट्रेन उभी होती तेव्हा लोहमार्ग क्रॉस करताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजते, मात्र हे निश्चित नाही, असे मंत्री पाटील यांनी म्हटले. 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

येथील रेल्वे अपघात 6 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी 8 रुग्णवाहिका देखील पोहोचल्या असून जिल्हा वैद्यकीय अधिकारी व रेल्वेचे अधिकारी मदतीसाठी प्रयत्नशील आहेत. येथील तीन रुग्णालयांना आपण सक्रीय राहण्याचे सांगितले असून ग्रामीण व जिल्हा रुग्णालयात जखमींना मदत करण्यात येत आहे. प्रांताधिकारी यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 6 ते 8 जण रेल्वेखाली आल्याची माहिती आहे. दरम्यान, जळगावचे पोलीस अधीक्षक एस.पी. महेश्वरी यांनी रेल्वे अपघाताबाबत माहिती देताना या रेल्वे अपघातात 11 जण ठार झाले असल्याचे म्हटलं आहे. 

मुख्यमंत्र्‍यांकडून शोक, मदतीसाठी यंत्रणा सज्ज

जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे.

हेही वाचा

आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Crime: शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
Chhaava Box Office Collection Day 40: वाढता वाढता वाढे 'छावा'ची कमाई; 40व्या दिवशीही बॉक्स ऑफिस ठेवलं ताब्यात, आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?
वाढता वाढता वाढे 'छावा'ची कमाई; 40व्या दिवशीही बॉक्स ऑफिस ठेवलं ताब्यात, आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 26 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सRajkiya Shole | Jaykumar Gore | कचाट्यात गोरे, पवारेंचे मोहरे? गोरेंच्या बचावासाठी फडणवीस मैदानातSpecial Report | Kunal Kamra Video | कुणाल कामराचा नवा व्हिडीओ, शिवसेनेला पुन्हा डिवचलंDmart Marathi Language Issue News | 'नाही येत मराठी..', परप्रांतीयांकडून माज, मनसैनिकांनी दाखवला 'मराठी' इंगा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli Crime: शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
शाळेत विद्यार्थ्यांसमोरच मुख्याधापकाचे शिक्षिकेशी अश्लील चाळे, 'रासलीला' पाहणाऱ्यांना मुलांना चोप
Chhaava Box Office Collection Day 40: वाढता वाढता वाढे 'छावा'ची कमाई; 40व्या दिवशीही बॉक्स ऑफिस ठेवलं ताब्यात, आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?
वाढता वाढता वाढे 'छावा'ची कमाई; 40व्या दिवशीही बॉक्स ऑफिस ठेवलं ताब्यात, आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून  नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
दुधात भेसळ करणाऱ्यांना मकोका लावणार, कायद्यात दुरुस्ती करणार; अजित पवारांची मोठी घोषणा
Nitesh Rane : मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
मुंबई कोस्टल रोडलगतच्या विकसित जागा महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करा; मंत्री नितेश राणे यांची मागणी
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश 
Maharashtra Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस, 23 दिवसांत कोणत्या महत्त्वाच्या घोषणा झाल्या, सर्वसामान्यांना नेमकं काय मिळालं?
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस, 23 दिवसांत सरकारने कोणते 12 महत्त्वाचे निर्णय घेतले?
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
Embed widget