Crime News : छेडछाडीला कंटाळून आठवीतील शाळकरी मुलीचं टोकाचं पाऊल, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Crime News : छेडछाडीला कंटाळून शाळकरी मुलीनं जीवन संपवत टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबावर शोककळा पसरला आहे.
![Crime News : छेडछाडीला कंटाळून आठवीतील शाळकरी मुलीचं टोकाचं पाऊल, कुटुंबावर दु:खाचा डोंगर Beed Crime News Tired of being teased eigth grade school girl suicide case was registered against two accused maharashtra marathi news Crime News : छेडछाडीला कंटाळून आठवीतील शाळकरी मुलीचं टोकाचं पाऊल, कुटुंबावर दु:खाचा डोंगर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/28/831483d0144900409eb28f73f69546ec1711648116697957_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : छेडछाडीला कंटाळून आठवीच्या वर्गातील मुलीचं टोकाचं पाऊल उचलल्यची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलांकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आपल्या मुलींने टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
छेडछाडीला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या
आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार बीडमध्ये घडला आहे. केजच्या औरंगपूर येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगपूर येथील मुलगी आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. गेल्या काही दिवसापासून दोन मुलांकडून तिला त्रास सुरू होता. दोन मुले छेडछाड करत या शाळकरी मुलीला वारंवार त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
शाळेतून येता-जाता मुलीची छेडछाड
शाळेतून येता-जाता ही मुले पीडित मुलीला वारंवार त्रास देत होती. दोन मुलांकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर शाळकरी मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करत टोकाचं पाऊल उचललं आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून युसुफ वडगाव पोलिसात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
राहुल शिंदे आणि सोमनाथ डिवरे असं गुन्हा दाखल झालेल्या मुलांची नावं असून यापूर्वी देखील या मुलांना समज देण्यात आली होती. मात्र तरीही त्यांनी या मुलीला त्रास दिला तर आमच्या गाडीवर बसली नाही तर परीक्षा देऊ देणार नाही, अशा धमक्या या दोघांनी या मुलीला दिल्या होत्या आणि त्यांच्याच त्रासाला कंटाळून मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पाचवीही मुलगीच झाली, आई-वडिलांनी कट रचला; चौथीची जिभ कापली, पाचवीची हत्या करुन मृतदेह पुरला, मुंब्र्यातील भयावह घटना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)