Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार?
Maharashtra Pushpak Express Train Accident : नव्या वर्षातली ही पहिलीच भीषण रेल्वे दुर्घटना आहे. ही दुर्घटना ज्याप्रकारे घडली ते धक्कादायक आहे.
Maharashtra Pushpak Express Train Accident : जळगावातल्या रेल्वे दुर्घटनेनं महाराष्ट्र हादरला. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशानं उड्या मारल्या. समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसच्या धडकेत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात नेमका कसा घडला? या अपघातासाठी नेमकं कोण जबाबदार आहे? असे प्रश्न आता उभा राहिले आहेत.
बुधवार संध्याकाळची वेळ... जळगाव रेल्वे स्थानकावरुन निघालेली पुष्पक एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेनं प्रवास करत होती. पण पावणे पाच वाजाताच्या सुमारास परधाडे स्थानकाजवळ येताच रेल्वेनं अचानक ब्रेक मारला. याचवेळी एका बोगीत आग लागल्याची अफवा उठली आणि आगीच्या भीतीमुळे प्रवाशांनी उड्या टाकल्या. पण समोरुन येणारी कर्नाटक एक्स्प्रेस या प्रवाशांसाठी काळ बनून आली. भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना चिरडलं. त्यात अनेकांचा जीव गेला.
अपघातानंतर अनेक मृतदेह कर्नाटक एक्स्प्रेसच्या खाली अडकून होते. दीड तासानंतर पुष्पक एक्स्प्रेस पुढे निघाली. पण बंगळुरु एक्स्प्रेसखालील मृतदेह बाजूला करण्याचं काम सुरु होतं. पोलिसांनी, रेल्वे सुरक्षा दलानं बचावकार्य तातडीनं सुरु केलं.
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यापैकी 9 पुरूष आणि 4 महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये मुंबईमधील एक, नेपाळच्या तीन आणि उत्तर प्रदेशातील तीन प्रवाशांचा समावेश आहे. तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. या अपघाताची माहिती मिळताच मंत्री गिरीष महाजन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
नव्या वर्षातली ही पहिलीच भीषण रेल्वे दुर्घटना आहे. ही दुर्घटना ज्याप्रकारे घडली ते धक्कादायक आहे. चौकशीनंतर या अपघातासंदर्भात आणखी काय माहिती समोर येतेय हे पाहणं महत्वाचं ठरेल.
Maharashtra Pushpak Express Train Accident : कसा झाला अपघात?
- जळगाववरुन मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसचा अचानक ब्रेक लागल्याने आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यावेळी डब्यात आगीची चर्चा सुरू झाली.
- यावेळी काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या.
- दुर्दैवानं समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसची प्रवाशांना धडक बसली.
- या घटनेमध्ये अनेकांचा मृत्यू झाला. जखमींवर आता उपचार सुरू आहेत.
ही बातमी वाचा: