Nashik Swine Flu : नाशिककरांची चिंता वाढली, पुन्हा स्वाईन फ्लूचा धोका वाढला, एकाचा मृत्यू तर दोघांवर उपचार सुरू
स्वाईन फ्लूने भर घातल्याने जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर दिसून येत आहे. आगामी काही दिवसात स्वाईन फ्लूने आपले पाय पसरु नये म्हणून जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत.
Nashik News: 'स्वाइन फ्लू'ने (Swine Flu) (H1N1) नाशिककरांची चिंता वाढवली आहे. शहरासह जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले तर एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू देखील झाला आहे. यामुळे आरोग्य प्रशासन आता अलर्ट मोडवर असून जिल्ह्यात स्वाईन फ्लू रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा पुन्हा शिरकाव आहे. उन्हाचा तडाखा वाढत असताना स्वाईन फ्लूचा धोकाही वाढला आहे. स्वाइन फ्लू मुळे एकाचा मृत्यू तर दोघांवर उपचार सुरू आहेत. सिन्नरमधील एका महिलेचा मृत्यू तर शहरातील दोन जणांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जातांना, थंड पेय घेताना काळजी घेण्याचे आवाहन
मृत्यू झाल्याने शहरासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र विषाणूजन्य तापाची साथ सुरु असून त्यात आता स्वाईन फ्लूने भर घातल्याने जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर दिसून येत आहे. आगामी काही दिवसात स्वाईन फ्लूने आपले पाय पसरु नये म्हणून जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत.
स्वाईन फ्लू कशामुळे होतो?
स्वाईन फ्लू, ज्याला स्वाईन इन्फ्लूएन्झा असेही म्हणतात, त्याचा परिणाम डुकरांमध्ये तीव्र श्वसन रोग झाला, जो नंतर मानवांमध्ये फ्लूचा H1N1 प्रकार, ए इन्फ्लूएंझा व्हायरसमध्ये विकसित झाला स्वाईन फ्लूच्या विषाणूचा मानवांमध्ये प्रसार होण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे जेव्हा संक्रमित व्यक्ती शिंकतो किंवा खोकतो. जेव्हा एखादी व्यक्ती विषाणूने संक्रमित झालेल्या एखाद्या गोष्टीला स्पर्श करते किंवा संपर्क करते किंवा संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या नाक, तोंड आणि आसपासच्या भागांना स्पर्श करते तेव्हा विषाणूचा संसर्ग होतो. स्वाईन फ्लू हा आजाराच्या पहिल्या पाच दिवसात संसर्गजन्य असतो. लहान मुले आणि वृद्धांमध्ये हे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
लक्षणे आणि उपचार
- सर्दी, ताप आणि श्वासोच्छवासाच्या समस्या ही सामान्य लक्षणे दिसतात.
- यामुळे घसा खवखवणे, सतत खोकला, नाक वाहणे, डोळ्यात पाणी येणे, डोकेदुखी, अतिसार आणि अत्यंत थकवा यासारख्या इतर लक्षणांसह न्यूमोनिया देखील होऊ शकतो.
- गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगणे
- ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे विकार, मूत्रपिंड आणि यकृताचे विकार, श्वसनाचे आजार, इत्यादी सह-विकृती असलेल्या रुग्णांना अधिक सावधगिरी बाळगावी
- H1N1 लक्षणांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीने स्वतःला वेगळे म्हणजेच आयसोलेट केले पाहिजे आणि ताबडतोब जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, घरी स्वत:च औषधे घेणे टाळावे.
हे ही वाचा :