Horoscope Today 16 April 2024 : आजचा मंगळवार खास! बाप्पाच्या कृपेने 'या' राशींच्या सर्व समस्या सुटणार; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 16 April 2024 : आज चैत्र महिन्याचा आठवा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो.
Horoscope Today 16 April 2024 : पंचांगानुसार, आज 16 एप्रिल 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. चैत्र महिन्याचा आठवा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा मंगळवारचा दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास
नवीन जबाबदाऱ्या कुशलतेने पेलाल आणि काहीतरी भरीव कार्य करून दाखवाल. महिला चाकोरीच्या बाहेर जाऊन काम करणार नाहीत.
वृषभ रास
नसती भांडणे उकरून काढण्याचे टाळावे लागेल. नोकरी व्यवसायातील अडकलेली कामे मार्गी लागतील.
मिथुन रास
हाताखालच्या लोकांचे उत्तम सहकार्य लाभल्यामुळे भरपूर काम कराल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल.
कर्क रास
आज मानसिक समाधान लाभेल. आज आपण काय करू शकतो याचा विचार तुम्ही जास्त कराल. महिला आघाडीवर राहतील.
सिंह रास
हाती घ्याल ते तडीस न्या, हा सुविचार मनात ठेवून त्याप्रमाणे कृती केली तरी यश येईल. वैवाहिक सौख्यामध्ये तडजोड करावी लागेल.
कन्या रास
जोडीदाराचे आरोग्य सांभाळावे लागेल. पित्त प्रकृती असणाऱ्यांनी त्याची पथ्य पाळावीत. गरजेल तो पडेल काय, हे म्हणण्याची संधी इतरांना देऊ नका.
तूळ रास
जरुरी पेक्षा जास्त आत्मविश्वास ठेवल्यामुळे स्वतःचे थोडे नुकसान करून घ्याल. त्यामुळे थोडी सावधानता बाळगा. महिला थोड्या अव्यवहारी बनतील.
वृश्चिक रास
स्वातंत्र्याच्या कल्पना आणि अहंकार यांचे कप्पे वेगळे ठेवले तर बरेच काही साधून जाल. खाजगी किंवा सरकारी नोकरीत त्रास संभवतो.
धनु रास
आज आपले काम चोख बजावा. कोर्ट कचेरी चालू असतील तर त्या संबंधित कामे रेंगाळतील. जुने आजार डोके वर काढतील.
मकर रास
समस्या या अनेकदा संधी असू शकतात हे जाणवेल. हा सकारात्मक विचार पुढे यश देण्यास कारणीभूत होईल.
कुंभ रास
तुमच्या व्यासंगाला पूरक ग्रहमान आहे. घरासाठी काही आवश्यक खर्च करावे लागतील. एकांगी विचार केल्यास त्रास होईल.
मीन रास
जबरदस्त इच्छाशक्तीचा फायदा आज तुम्हाला करून घ्यायचा आहे. परंतु तुमच्या रसिकतेला अरसिकतेची जोड मिळाल्यास जी घुसमट होते ती थोडी अनुभवणार आहात.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: