एक्स्प्लोर

फडणवीसांकडून आमदारकीची ऑफर, उत्तम जानकर काय भूमिका घेणार? 19 एप्रिलला निर्णय जाहीर करणार

Uttam Jankar : फडणवीस यांनी आमदारकीची ऑफर दिली, तरीही उत्तम जानकर भाजपच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करायला जाणार नसल्याचं उत्तम जानकरांनी सांगितलं आहे.

सोलापूर : माढा (Madha) लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) रोज नवनवीन घडामोडींचा वेग येत असताना आता नागपूर येथे खास विमानाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आलेले उत्तम जानकर (Uttam Jankar) यांना थेट आमदारकीची ऑफर देण्यात आली. फडणवीसांनी आमदारकीची ऑफर देऊन देखील उत्तम जानकर भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार नसल्याचे त्यांनी सांगितल्याने भाजपच्या अडचणी कायम आहेत. धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांच्या पाठिंबा मिळवत माढा लोकसभा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

उत्तम जानकरांना फडणवीसांकडून आमदारकीची ऑफर

मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक आणि माळशिरस तालुक्यातील तुल्यबळ नेता अशी ओळख असणाऱ्या उत्तम जानकर यांची समजूत काढण्यासाठी यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळेला त्यांच्यासोबत मुंबई येथील सागर बंगल्यावर बैठक केली होती. यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर सोमवारी जानकर यांच्यासाठी खास विमान पाठवून त्यांना नागपूर येथे बोलावण्यात आलं होतं.

उत्तम जानकर भूमिका बदलणार? 

नागपूरहून बैठकीनंतर परतल्यावर जानकर यांनी त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांशी गरुड बंगल्यावर चर्चा केली आणि फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. यानंतर आता 19 एप्रिल रोजी सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत बैठक घेऊन भाजप की मोहिते पाटील याचा निर्णय केला जाणार आहे. यामुळेच खुद्द फडणवीस यांनी निमंत्रण देऊनही जानकर यांनी माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजित निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जाणार नसल्याचं सांगितलं आहे. 

19 एप्रिलला मोठा निर्णय घेणार

कार्यकर्त्यांशी चर्चा करून मगच काय निर्णय घ्यायचा हे 19 एप्रिल रोजी ठरणार असल्याने आपण फडणवीस यांना तसं कळवू, असं जानकर यांनी सांगितलं आहे. मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर फडणवीस हे ॲक्टिव मोडवर येऊन त्यांनी तातडीने जानकर यांना खास विमान पाठवलं होतं. सोमवारी उत्तम जानकर यांच्यासोबत खासदार रणजित निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार जयकुमार गोरे आणि पांडुरंग वाघमोडे हे नागपूरला पोहोचले होते. यावेळी फडणवीस यांच्यासोबत तासभर झालेल्या चर्चेत जानकर यांचं समाधान झालेलं आहे. मात्र आता सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन 19 एप्रिलला निर्णय केला जाणार असून जो निर्णय होईल त्याच्या प्रचारासाठी उतरणार असल्याचं जानकर यांनी सांगितलं आहे.

यापुढे ताकद देण्याचं फडणवीसांचं आश्वासन

फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत जानकर यांनी गेल्या 10 वर्षात भाजपकडून कसा अन्याय झाला, याचा पाढाच वाचल्यावर फडणवीस यांनी हे मान्य करीत यापुढे ताकद देण्याचं आश्वासन दिलं आहे. मोहिते पाटील भाजपमध्ये आल्याने नाराज होऊन जानकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून 2019 मध्ये विधानसभा लढवली होती. यामध्ये जानकर यांनी एक लाखापेक्षा जास्त मते घेत मोहिते पाटील गटाला टक्कर दिली होती. भाजपकडून झालेल्या अन्यायाबाबत बोलताना मोहिते पाटील भाजपमध्ये आल्याने अन्याय झाला असला, तरी आता ते पक्ष सोडून गेल्याने तुम्हाला रान मोकळं झाल्याचं फडणवीस यांनी सांगितल्याचं जानकर यांनी सांगितलं.

उत्तम जानकर यांना आमदार करण्याचा फडणवीसांचा शब्द

उत्तम जानकर यांना विधानसभा किंवा विधान परिषदेतून आमदार करण्याचा शब्द फडणवीस यांनी दिला असला तरी मंत्रिपदाबाबत मात्र शब्द दिला नसल्याची कबूली दिली आहे. यंदा विधानसभा दोन महिने अलीकडे म्हणजे ऑगस्टमध्ये घेण्याच्या हालचाली असल्याने आपल्याला विधानसभेची उमेदवारीही मिळू शकेल किंवा विधान परिषदेतून आमदारकी मिळेल, असं जानकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. आता कार्यकर्ते काय भूमिका घेणार हे 19 एप्रिल रोजी ठरणार असल्याने या बैठकीनंतर आपण कोणाचा प्रचार करणार हे जाहीर करणार असल्याचं जानकरांनी सांगितलं आहे. 

आता उत्तम जानकर यांच्या भूमिकेकडे मोहिते पाटील आणि भाजप या दोघांचंही लक्ष लागून राहिलं असून जानकर कोणाला मदत करणार याचा निर्णय 19 एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीत होणार आहे. जानकर यांनी फडणवीस यांना कबूल केल्याप्रमाणे आपली ताकद भाजपच्या मागे उभी केल्यास निंबाळकर यांना निवडणूक सोपी होणार आहे. मात्र जानकर हे मोहिते पाटील यांच्यामागे राहिले तर, भाजपाला विजयासाठी निकरीचा प्रयत्न करावे लागणार असून फडणवीस यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक बनणार आहे. 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget