एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यभरात मान्सूनचं आगमन, बळीराजा सुखावला
मुंबई : मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मान्सून सक्रिय झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे. मान्सून गुजरातच्या वलसाडपर्यंत तसंच मुंबई, पुणे, नाशिक आणि मराठवाड्यातील परभणी भागात सक्रीय झाल्याचंही हवामान खात्यानं सांगितलं आहे.
पुढच्या 48 तासात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येत्या 15 ते 18 जूनपर्यंत राज्यभर मान्सून सक्रीय होईल असा अंदाज मुंबई हवामान विभागानं वर्तवला आहे.
पावसाच्या आगमनानं बळीराजाही सुखावला आहे. राज्यभरात शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु झाली आहे.
राज्यभरात पावसाची हजेरी
शिर्डीजवळील राहता तालुक्यातील अनेक गावांत मुसळधार पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं राहता तालुका अक्षरक्षः न्हाऊन निघाला. मुसळधार पावसामुळं राहता शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती संकुलात पाणी घुसलं होतं. असं असलं तरी पावसाच्या दमदार आगमनामुळं तालुक्यातील नागरिक सुखावले आहेत.
कोकणातही पावसाची दमदार बॅटिंग
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, उरण, म्हसळा, श्रीवर्धन आणि महाडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी संध्याकाळी वादळी वाऱा आणि विजांच्या कडकडाटासह रायगडमध्ये मुसळधार पाऊस झाला. दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळही उडाली. गेल्या काही दिवसांपासून रायगडमधील अनेक तालुक्यात ढगाळ वातावरण होतं. दरम्यान काल सायंकाळी काही प्रमाणात पावसाच्या हलक्या सरी देखील बरसल्या. मात्र काल रात्री झालेल्या पावसाच्या दमदार एन्ट्रीने बळीराजाही सुखावला आहे.
विदर्भात पावसाची एंट्री
विदर्भात दमदार पाऊस सुरु झाल्यानंतर आता शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. वाशिम आणि यवतमाळमध्ये पेरणी सुरुही झाली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरणीला सुरुवात झालीय. यवतमाळमध्ये काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.
सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं आणखी चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करु नका, असं आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. दरम्यान सध्या पाऊस सुरु असल्यानं कृषी केंद्रांवरही गर्दी पाहायला मिळत आहे. बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी लगबग सुरु झाली आहे.
नाशिकमध्ये पावसामुळे सप्तश्रुंगी गडावर दरड कोसळली
नाशिक जिल्ह्यातल्या वणीमधील सप्तशृंगगडावर मुसळधार पावसामुळं दरड कोसळली. मात्र सुदैवानं मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या संरक्षक जाळीमध्ये हे दगड अडकल्यानं मंदिरासह भाविकही सुरक्षित राहिले. मंदिराच्या सुरक्षेसाठी ज्या संरक्षक जाळ्या डोंगराच्या कपारीमध्ये बसविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दोन मोठे दगड डोंगरमाथ्यावरून कोसळले. दरड कोसळल्यानं मोठा आवाज झाल्यानं भाविकांसह परिसरातील विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली होती.
नांदेडमध्येही वीजेचा कहर
नांदेडमध्ये काल वीजेचा तांडव पाहायला मिळाला. यात एकाच ठिकाणी वीज पडून पाच महिलांचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातल्या कारला माळ परिसरात ही घटना घडली आहे.
काही महिला शेतामध्ये गेल्या होत्या. अचानकपणे विजांचा कडकडाट सुरु झाला, त्यानंतर या महिला एका झाडाखाली बसल्या. आणि त्याच झाडावर वीज कोसळली. त्यामुळे पाच महिलांना आपला जीव गमवावा लागला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
राजकारण
Advertisement