एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

...तर मनसे नाणारवासियांसाठी रस्त्यावर उतरेल!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला आपला विरोध दर्शवला आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला आपला विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नाणारवासियांनी आज राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. यावेळी राज यांनी नाणारवासियांना आश्वासन दिलं, की सरकारकडून या प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर मनसे त्याविरोधात रस्त्यावर उतरेल. नाणारच्या प्रकल्पग्रस्तांनी आज (शनिवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला आपला विरोध दर्शवला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी नाणारवासियांना आश्वासन दिलं, की, ‘सरकारकडून या प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर मनसे त्याविरोधात रस्त्यावर उतरेल.’ केंद्र सरकारकडून नाणार प्रकल्पाला हिरवा कंदील रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये सौदी अरेबियाची अरामको ही मोठी कंपनी 50 टक्के गुंतवणूक करणार आहे. या संदर्भातल्या सामंजस्य करारावर दोनच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत सह्याही झाल्या. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांचा हा संयुक्त प्रकल्प रत्नागिरीजवळ असलेल्या नाणारमध्ये उभारण्यात येणार आहे. या संदर्भात प्रारंभिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली होती. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या या प्रकल्पामुळे सौदीच्या खनिज तेलाची मागणी कायम राहील, तसंच भारताला कमी खर्चामध्ये इंधनाची उपलब्धता होईल असं सांगण्यात येत आहे. पेट्रोल व डिझेलच्या बाबतीत भारत हा संवेदनशील देश असून कच्च्या तेलाची किंमत 50 डॉलर प्रति पिंप असल्यास ते भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आश्वासक असेल. असे मत धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं. नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रति दिन 12 लाख पिंप इतकी असणार असून अरमाकोनं तत्वत: या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. VIDEO : संबंधित बातम्या : कणाहीन मुख्यमंत्र्यांना नाणार प्रकल्प लादू देणार नाही : उद्धव ठाकरे

नाणार प्रकल्पाला हळूहळू सगळे समर्थन करतील : धर्मेंद्र प्रधान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?Maharashtra Exit Poll 2024 | विधानसभा निवडणुकीचा Exit Poll, कुणाला किती जागा मिळणार? ABP MajhaMaharashtra Exit Poll | महायुती 121, महाविकास आघाडीला 150 जागा मिळण्याची शक्यता ABP MajhaNitesh Karale Master : भर रस्त्यात मारहाण,मुलीलाही लागल; कराळे मास्तरांनी सांगितलं पूर्ण कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Exit Poll Result : शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
Embed widget