एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
भाजपच्या सत्तेला तडा, राज ठाकरेंचं बोलकं व्यंगचित्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या व्यंगचित्रातून भाजपच्या सत्तेला कधीही न भरुन निघणारा तडा गेल्याचे म्हटले आहे.
![भाजपच्या सत्तेला तडा, राज ठाकरेंचं बोलकं व्यंगचित्र mns chief raj thakrey criticizes pm narendra modi and bjp after bjp failed in assembly election 2018 भाजपच्या सत्तेला तडा, राज ठाकरेंचं बोलकं व्यंगचित्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/12/11232629/raj-cartoon.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये भाजपचा सपशेल पराभव झाला असल्याने सर्वांनी भाजपवर हलाला चढवला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी आजच्या व्यंगचित्रातून भाजपच्या सत्तेला कधीही न भरुन निघणारा तडा गेल्याचे म्हटले आहे.
राजस्थान,मध्य प्रदेश,छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमधली 15 वर्षांपासूनची सत्ता भाजपने गमावली. त्यासोबत राजस्थानमधली गेल्या 5 वर्षांपासूनची सत्ता गमावली आहे. तसेच तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांमध्येही भाजपाने निराशाजनक कामगिरी केली आहे. भाजपच्या या पराभवानंतर राज ठाकरे यांनी त्यांचा व्यंगचित्रांच्या माध्यमातून मोदी आणि भाजपवर बोचरी टिका केली आहे.
काय आहे व्यंगचित्रात
या पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेच्या खुर्तीत बसलेले आहेत, त्यांच्यामागे भाजप अध्यक्ष अमित शहा ही खुर्ची पकडून उभे आहेत. परंतु या खुर्चीखालची जमीन सरकल्याचं दाखवले आहे. तसेच जमिनीला मोठी भेग पडली आहे. या व्यंगचित्रावर "तडा, कधीही न भरुन निघणारा" असे कॅप्शन दिले आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि फेसबुकवर हे व्यंगचित्र पोस्ट केल्यानंतर नेटीझन्सनी या व्यंगचित्राला पसंतीची पावती दर्शवली आहे.
#AssemblyElectionsResults2018 #MadhyaPradesh #Rajasthan #Telangana #Chhatisgarh #Mizoram #NarendraModi #AmitShah #BJPgovernment pic.twitter.com/R2dmLIk06P
— Raj Thackeray (@RajThackeray) December 11, 2018
#AssemblyElectionsResults2018 #MadhyaPradesh #Rajasthan #Telangana #Chhatisgarh #Mizoram #NarendraModi #AmitShah #BJPgovernment pic.twitter.com/3OLnbFEdi2
— Raj Thackeray (@RajThackeray) December 11, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)