एक्स्प्लोर

Bacchu Kadu : महाराष्ट्राचा शेतकरी वेगळा अन् गुजरातचा वेगळा आहे का? कांदा निर्यातीच्या निर्णयावरून बच्चू कडूंचा संतप्त सवाल, म्हणाले....

Bacchu Kadu : प्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत कांद्याच्या निर्यातीचा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

Bacchu Kadu On Exports Of Onions : देशभरात कांदा निर्यात बंदी असतानाच केंद्रानं गुजरातमधून तब्बल 2 हजार मेट्रीक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला (Exports Of Onions) मंजूर दिलीय. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Indian farmer) चांगलेच आक्रमक झाले असून शेतकऱ्यांकडून या निर्णया विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे विरोधकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच आता प्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

महाराष्ट्रचा शेतकरी वेगळा अन् गुजरातचा वेगळाय का? 

यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, केंद्र सरकारकडून नवीन जातीवाद निर्माण केल्या जात आहे. गुजरातचा शेतकरी वेगळा आणि महाराष्ट्राचा शेतकरी वेगळा. अशी दुर्दैवी भूमिका केंद्र सरकार घेत असल्याने, शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे बच्चू कडू म्हणाले. जर निर्यात करायची असेल तर सगळ्याच भागातील निर्यातीला केंद्राने परवानगी दिली पाहीजे. हा निर्णय देशभरातील शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे. तसेच केंद्र सरकार दुटप्पी भूमिका घेतांना दिसत आहे. त्यामुळे यावर वेळीच निर्णय मागे घेणे अपेक्षित आहे. अन्यथा वेळ पडली तर आम्ही त्यासाठी मोठे आंदोलन करून रस्त्यावर उतरू, असा इशाराही आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.

माझ्यासाठी प्रथमस्थानी शेतकरी- बच्चू कडू

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमान शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांना आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने जाहीर पाठिंबा दिलाय. तर येत्या 2 किंवा 3 मे रोजी बच्चू कडू राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात जाणार असल्याची माहितीही स्वतः बच्चू कडू यांनी एबीपी माझाला दिलीय. बच्चू कडू म्हणाले की, राजू शेट्टी हे शेतकरी नेते आहेत. मी त्यांना पाठिंबा दिला असून त्यांच्या दोन तीन सभेला देखील जाणार आहे. असे असताना, मी जेव्हा पाठिंबा जाहीर केला त्यावेळी मला राज्यातील काही मराठा नेत्यांचे फोन आले. या लोकसभेत दोन मराठा नेते उभे आहे. त्यामुळे तुम्ही स्वत: मराठा असूनही राजू शेट्टीना पाठिंबा का देताय, अशी विचारणा त्यांनी केली. मात्र, मी त्यांना सांगितले की माझ्यासाठी प्रथमस्थानी शेतकरी आहेत आणि राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी नेहमी झटत असतात. त्यामुळे मी असा निर्णय घेतल्याची माहितीही ही बच्चू कडू यांनी दिली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नवा गौप्यस्फोट, पंकजाताईबाबत म्हणाले...Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP MajhaSiddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावेABP Majha Headlines : 04 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Anil parab मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
मी मार खाऊन ती शाखा बांधली, ताब्यात घेणारच; शिंदे गटात प्रवेश होताच अनिल परबांचा इशारा
Embed widget