Amol Kolhe : गुजरातच्या कांद्याची निर्यातबंदी उठवली मग मतं देशभर का मागताय? अमोल कोल्हेंचा सवाल
भाजप सरकारने गुजरातमधील दोन हजार टन कांद्यावरील निर्यातबंदी उठवली. म्हणजे या सरकारला फक्त गुजरातमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आहे, मग तिकडेच जाऊन मतं का मागत नाही?,असा सवाल अमोल कोल्हेंनी उभा केलाय.
आंबेगाव, पुणे : भाजप सरकारने गुजरातमधील दोन हजार टन कांद्यावरील) निर्यातबंदी उठवली. म्हणजे या सरकारला फक्त गुजरातमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आहे, असं असेल तर भाजप फक्त गुजरातला जाऊन मतं का मागत नाही? असा सवाल अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) उभा केलाय. शिरूर लोकसभेतील आंबेगाव विधानसभेत आज कोल्हे प्रचार करतायेत. यावेळी शेतकऱ्यांची (Indian farmer) डोळं उघडणारी सर्वात मोठी बातमी समोर आलीये, असं म्हणत कोल्हेंनी भाजपला घेरलं.
अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्रापेक्षा कमी कांदा उत्पादक शेतकरी हा गुजरात मध्ये आहे. तरी केंद्र सरकारने गुजरातच्या 2 हजार टन कांद्याची निर्यात बंदी उठवली. मोदी सरकारला फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितसंबंधाची चिंता असल्याचं या निर्णयाने दाखवून दिलं आहे. त्यामुळे मत मागायला गुजरातलाच जा, इकडे येऊच नका. अशा खणखणीत शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कांदा निर्यातीच्या धोरणावरून मोदी सरकारवर थेट हल्ला केला.
मत मागायला तिकडेच जा. इकडे येऊच नका!
भाजप सरकार सर्वात कमी कांदा उत्पादन घेणाऱ्या गुजरातमधील कांद्याची निर्यातबंदी हटवते, म्हणजे महाराष्ट्रासह इतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता नाही का? असं म्हणत कोल्हेंनी भाजपच्या निर्णयाचा विरोध केला. कोल्हे पुढे म्हणाले की, तुमच्या माझ्या कांद्याची माती होती. तुमच्या माझ्या ताटात माती कालवली जाती, याच्याशी मोदी सरकारला काही देणंघेणं नाही. हे आजच्या निर्णयावरून मोदी सरकारने दाखवून दिलं आहे. जर मोदी सरकार फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निर्णय घेत असेल तर आपण पण त्यांना सांगू शकतो मत मागायला तिकडेच जा. इकडे येऊच नका. असं सांगत भाजपच्या या निर्णयाला कोल्हे यांनी कडाडून विरोध केला.
देशातलं सरकार बदलणार; अमोल कोल्हे
देशामध्ये सर्वाधिक जागा काँगेस लढत आहे, देशातील वारं बदललं आहे. भाजप सरकारने महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची दैना करून ठेवल्यामुळे देशातील जनता भाजपच्या सरकारवर नाराज आहे. केंद्रात इंडिया आघाडीचे वारे वाहू लागले आहे. केंद्रातील मोदी सरकार जाऊन नवीन सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. असं म्हणत डॉ. कोल्हे यांनी केंद्रातील सरकार बदलणार असल्याचे सूतोवाच केले आहे.
इतर महत्वाची बातमी-