मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची केली फसवणूक; PMLA कोर्टाचं निरीक्षण
मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची केली फसवणूक केल्याचं निरीक्षण पीएमएलए कोर्टाकडून नोंदवण्यात आलं आहे.
Minister Hasan Mushrif: मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असं निरीक्षण पीएमएलए कोर्टाकडून (PMLA Court) नोंदवण्यात आलं आहे. महेश गुरवचा जामीन अर्ज फेटाळताना पीएमएलए कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलं. शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे फर्ममध्ये इन्वेस्ट केल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणावरील (Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory Money Laundering Case) सुनावणी दरम्यान हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष पीएमएलए कोर्टानं हसन मुश्रीफ यांचे पीए आणि निकटवर्तीय असणारे महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. यापूर्वी पीएमएलए कोर्टानं हसन मुश्रीफ यांनाही अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला असून अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यापाठोपाठ आता मेहश गुरवही अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.
मंत्री हसन मुश्रीफ आणि महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पीएमएलए कोर्टानं फेटाळल्यानंतर आता याप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांनीही अटकपूर्व जामीनासाठीचा मार्ग आणखी कठीण होत असल्याचं दिसत आहे. याप्रकरणी या सर्वांनी मिळून घोटाळा केल्याचं मत कोर्टानं व्यक्त केलं आहे. त्यामुळे याप्रकरणात कोणालाही अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
हसन मुश्रीफांच्या तीनही मुलांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेतली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं तिघांच्याही अटकपूर्व जामीनावरील निकाल राखून ठेवला आहे. पुढच्या आठवड्यात कोर्टाकडून तिघांच्याही अटकपूर्व जामीनावरील सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीय यांच्या अडचणी याप्रकरणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ : Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची केली फसवणूक - पीएमएलए कोर्ट
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अजित पवार गटासोबत असणारे बेचाळीसावे आमदार नवाब मलिक; सुत्रांची माहिती