अजित पवार गटासोबत असणारे बेचाळीसावे आमदार नवाब मलिक; सुत्रांची माहिती
Maharashtra Politics: निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा सोबत 42 आमदार असल्याचा दावा. बेचाळीसावा आमदार नवाब मलिक असल्याची माहिती
Maharashtra Political Updates: अजित पवार गटासोबत (Ajit Pawar Group) असणारा बेचाळीसावे आमदार कोण? असा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळात (Maharashtra Politi गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ते बेचाळीसावे आमदार म्हणजे, नवाब मलिक (Nawab Malik) असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर येत आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) सुनावणी दरम्यान, अजित पवार गटाकडून असा दावा करण्यात आला आहे. तसेच, नवाब मलिकांना तुरुंगातून बाहेर काढण्यामागे अजित पवार असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.
राष्ट्रवादी कोणाची? हा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर गेला असून यावर सुनावणी सुरू आहे. काल (शुक्रवार) पासून सुरू असलेल्या या सुनावणी दरम्यान अजित पवार गटानं 42 आमदार आपल्या बाजूनं असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या एकूण 53 आमदारांपैकी 42 आमदार आमच्या पाठीशी असल्याचा दावा अजित पवार गटाच्या वतीनं करण्यात आला होता.
सध्या सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या 41 आमदारांची यादी व्हायरल होत आहे. मात्र, अजित पवार गटानं 42 आमदार आपल्या बाजून असल्याचा दावा केला. त्यामुळे तो बेचाळीसावा आमदार कोण? अशी चर्चा रंगली होती. यासंदर्भात एबीपी माझानं एजित पवार गटाशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी यासंदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला.