एक्स्प्लोर
राज ठाकरेंपेक्षा ओवेसींचा करिष्मा, एमआयएमचे 40 नगरसेवक
मुंबई : महाराष्ट्रात राज ठाकरेंपेक्षा असदुद्दीन ओवेसींचा करिष्मा जास्त आहे का, असा प्रश्न पडला आहे. कारण नगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमनं जोरदार मुसंडी मारली आहे. एमआयएमचे तब्बल 40 नगरसेवक निवडून आले आहेत.
एमआयएमचे 40 नगरसेवक निवडून आलेले असताना मनसेला मात्र फक्त 12 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नगरपालिकेच्या निवडणुकीत तरी मनसेपेक्षा एमआयएमचा प्रभाव जास्त असल्याचं चित्र आहे.
बीडमध्ये एमआयएमचे 9 नगरसेवक निवडून आले आहेत. विशेष म्हणजे इथं नगराध्यक्षपदासाठी एमआयएमचा उमेदवार दुसऱ्या स्थानावर आहे. तर मनसेचा खेड पालिकेवर झेंडा फडकला आहे. नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर मनसेचे वैभव खेडेकर विराजमान झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement