एक्स्प्लोर
Advertisement
माथेरानची 'टॉय ट्रेन' रुळांवरुन घसरली
एकीकडे आकर्षक एसी डबे, नवे डबे आणण्याची गोष्ट मध्य रेल्वे करत आहे. परंतू आधी आहे ती गाडी सुरक्षित चालत नाही याचा विचार करण्याची वेळ मध्य रेल्वेवर आली आहे.
रायगड : पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा सुरु झालेली माथेरानची फुलराणी अर्थात 'टॉय ट्रेन' रुळांवरुन घसरली. काल रविवारी माथेरानची राणी रुळांवरुन घसरण्याची घटना घडली. शनीवारीच माथेरानची राणी प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आली होती.
रविवारी अमन लॉज ते माथेरान मार्गावर ही गाडी जात असतानाच ट्रेन दोन चाके घसरली. पण यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुपारी साधारण 11.30 ला ही घटना घडली. अखेर 2 वाजता पुन्हा घसरलेले डबे ट्रॅकवर आणण्यात आले.
एकीकडे आकर्षक एसी डबे, नवे डबे आणण्याची गोष्ट मध्य रेल्वे करत आहे. परंतू आधी आहे ती गाडी सुरक्षित चालत नाही याचा विचार करण्याची वेळ मध्य रेल्वेवर आली आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मे 2016 मध्ये मिनी ट्रेनचे डबे रुळावरुन घसरल्याच्या दोन घटनांमुळे ही सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर सुरक्षिततेचे उपाय केल्यानंतर रविवारी पुन्हा एकदा ही सेवा सुरु करण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
कोल्हापूर
क्रिकेट
Advertisement