एक्स्प्लोर

यंदाचं अभा मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये; कौतिकराव ठाले पाटील यांची घोषणा, दिल्लीची संधी हुकली

कोरोनामुळे यावर्षीचं साहित्य संमेलन होणार की नाही, झालं तरी कुठे आणि कसं होणार याविषयी अनेक चर्चा होत्या. मात्र आज साहित्य महामंडळाने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.यंदाचं अभा मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्येच होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केली.

औरंगाबाद : यावर्षी होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार आहे. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आज औरंगाबादमध्ये ही घोषणा केली. कोरोनाची परिस्थिती निवळल्यामुळे साहित्य संमेलन भरवण्याबाबतचा निर्णय महामंडळाने घेतल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं. यावर्षी होणारं साहित्य संमेलन हे 94 वं असेल. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची घोषणा 24 जानेवारीला करण्यात येईल.

कोरोनामुळे यावर्षीचं साहित्य संमेलन होणार की नाही, झालं तरी कुठे आणि कसं होणार याविषयी अनेक चर्चा होत्या. मात्र आज साहित्य महामंडळाने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. कोरोनाचं संकट येण्यापूर्वीच परभणी जिल्ह्यातील सेलू, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, नाशिक आणि पुण्याच्या सरहद संस्थेकडून राजधानी नवी दिल्लीत संमेलन घेण्याविषयीचे प्रस्ताव महामंडळाकडे आल्याचं कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र कोरोनाचा कहर सुरु झाल्यानंतर सेलू आणि अमळनेर येथील आयोजक संस्थांनी साहित्य संमेलन भरवण्यासाठी असमर्थता दर्शवली. पुण्याच्या सरहद या संस्थेनेही दिल्लीत कोरोनामुळे साहित्य संमेलन आयोजित करत नसल्याचं कळवलं असल्याचं ठाले पाटील म्हणाले. त्यामुळेच नाशिकमध्ये यावर्षीचं साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकच्या लोकहितवादी संस्थेकडे साहित्य संमेलनाचं आयोजकत्व देण्यात आलं आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवण्याचं नियोजन आहे. संमेलनाच्या नेमक्या तारखा नाशिककरांशी चर्चा करुनच निश्चित केल्या जातील, असंही कौतिकराव ठाले पाटील यांनी स्पष्ट केलं. साहित्य महामंडळाचं संमेलन स्थळ निवड पाहणी समितीने फक्त नाशिकचीच पाहणी काल केली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, नाशिक शहराची साहित्य संमेलनासाठी निवड करण्यात आली आहे.

पुण्यातील संजय नहार यांच्या सरहद संस्थेने राजधानी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन घेण्याची फेरविनंती केली होती, मात्र त्यांचा प्रस्ताव मे महिन्यात साहित्य संमेलन घेण्यासाठी होता. दिल्लीतल्या मराठी संस्थांनी सुरवातीला साहित्य संमेलनाचं आयोजकत्व स्विकारण्याची तयारी दाखवली होती, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांनी रद्दही केली. नंतर कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर साहित्य संमेलन भरवण्यासाठी पुण्यातील सरहद संस्थेमार्फत फेरनिमंत्रण पाठवण्यात आलं. त्यानुसार खास दिल्लीकरांसाठी विशेष साहित्य संमेलन भरवण्याचा प्रस्ताव साहित्य महामंडळाकडून देण्यात आला होता, मात्र सरहद संस्थेचे संजय नहार यांनी हा प्रस्ताव नाकारल्याचं कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरूPune Eknath Shinde : पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल : एकनाथ शिंदेAshok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Embed widget