
Maratha Reservation Protest LIVE: छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातील इंटरनेट बंद करण्याचे गृह विभागाचे आदेश
Maratha Reservation Protest LIVE Updates: मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस असून आहे, तर आरक्षणासाठी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
LIVE

Background
Pune Maratha Protest: पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्डची बंदची हाक, सर्व व्यापारी सहभागी
Pune Maratha Protest: पुण्यातील महात्मा फुले मंडई आज मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला पाठिंबा देण्यासाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. तर मोर्चा काढत मामलेदार कचेरी इथे जाऊन निवेदन देण्यात येणार आहे. मराठा आरक्षण मिळाले तर आमच्या पोरा बाळांच्या शिक्षणाचा, नोकरीचा प्रश्न सुटेल अशी भावना व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र आता या आंदोलनाचा फटका हा सर्व सामान्य लोकांना बसताना दिसतोय कारण महात्मा फुले मंडई ही गजबजलेली असते मात्र आज ती बंद ठेवण्यात आली आहे.
Pawai Maratha Protest: पवईमध्ये मराठा समाजाचे आंदोलन
Pawai Maratha Protest: मुंबईच्या पवई परिसरातील सकल मराठा समाजाने आज पवई प्लाझा जोगेश्वरी लिंक रोड परिसरात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी सकल मराठा समाजाकडून जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत जर जरांगे पाटलांचा काही बरं वाईट झालं तर मराठा समाज हा आक्रमक होऊन रस्त्यावर उतरेल अशी भूमिका मांडण्यात आली तसेच पवईतील जनप्रतिनिधींना कुठलेही राजकीय कार्यक्रम जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत घेऊ नका असं आवाहन देखील पवई मराठा सकल समाजाकडून करण्यात आलं यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
Dharashiv Maratha Protest : आज सायंकाळी 5 वाजेपासून धाराशिव जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आलेली आहे. तथापि जमावबंदी व शस्त्रबंदी लागू असणार
Maratha Reservation Protest : आज सायंकाळी 5 वाजेपासून धाराशिव जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आलेली आहे. तथापि जमावबंदी व शस्त्रबंदी लागू असणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
Maratha Reservation Protest: विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठाकरे, शरद पवार गटाचं आंदोलन; सुप्रीया सुळेही सहभागी
Mumbai Maratha Reservation Protest: विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठाकरे आणि शरद पवार गटाच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी (शरद पवार गट) खासदार सुप्रीया सुळे यादेखील उपस्थित असून आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
Chhatrapati Sambhajinagar Maratha Protest : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातील इंटरनेट बंद करण्याचे गृह विभागाचे आदेश
Maratha Reservation Protest : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातील इंटरनेट बंद करण्याचे गृह विभागाने आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व टेलिकॉम कंपन्यांना या आदेशाचे पालन करण्याची सूचना केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
