एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Eknath Shinde: जरांगे पाटलांनी सहकार्य करत उपोषण मागे घ्यावं, सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांचं आवाहन

राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)  विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय  32 नेत्यांची  बैठक पार पडली. राज्यातील मराठा समाजाची दाहकता कमी करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली.इतर समाजावर अन्याय  न होता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. हिंसाचाराच्या घटनांवर सर्वच नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे  राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सरकार प्राधान्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकडे लक्ष देत असून, महाराष्ट्रात जाती-जातींमध्ये सलोख्याची संस्कृती टिकवणे महत्वाचे आहे. आपल्या सगळ्यांचा उद्देश मराठा समाजाला आरक्षण देण्याचा असून, सर्व पक्ष संघटनांनी आपआपल्या भागात या विषयी आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितले पाहिजे. एकीकडे आपण सर्वोच्च न्यायालयात क्युरिएटेव्ह याचिकेद्वारे राज्य शासनाची भूमिका भक्कमपणे मांडत आहोत. त्यासाठी न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ नियुक्त केले आहे. दुसरीकडे आपण मागासवर्ग आयोगाला नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचे निर्देशही दिले आहेत. 

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी ज्या कारणांमुळे आणि त्रुटींमुळे रद्द केले होते, तसेच जी निरिक्षणे नोंदविली होती. त्या त्रुटी आता नव्याने डाटा गोळा करताना होणार नाहीत, याची संपूर्ण काळजी घेण्यात येणार आहे. या पावलांमुळे न्यायालयात टिकणारे असे आरक्षण मराठा समाजाला मिळू शकेल, अशी खात्री आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर तत्काळ या संदर्भातील शासन आदेश काढण्यात आला असून सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना कालच व्हिसीद्वारे कुणबी नोंदी असलेल्यांना तातडीने प्रमाणपत्रे देण्याचे निर्देश दिले आहेत. मोडी लिपीतील आणि उर्दू भाषेतील कागदपत्रांचे भाषांतर करून, डिजीटाईझ करण्यासाठी व पब्लिक डोमेनवर आणून त्याआधारे कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत. 

 फडणवीस यांनी देखील न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलण्यात येतील तसेच राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून त्रुटी नसलेला, परिपूर्ण डाटा विहित कालावधीत गोळा करण्यात येणार असल्याचे सांगितल, असे शिंदे म्हणाले.  राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

हे ही वाचा :

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?Prakashrao Abitkar : जनता माझ्यासोबत असल्यानंच माझा विजय - प्रकाश आबिटकरABP Majha Headlines :  2 PM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly Election Results 2024: बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
MLA List Maharashtra 2024 : महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी 2024, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
Pune Paschim Assembly Election Winner List 2024 : कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
Embed widget