एक्स्प्लोर
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र तयार
मुंबईः मराठा समाज हा सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागास आहे, अशा आशयाचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने तयार केलं आहे. उद्या हायकोर्टात मराठा आरक्षण याचिकेवरील सुनावणी होणार आहे. यावेळी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं जाण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यभर मूक मोर्चे काढले जात आहेत. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रामध्ये मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी हायकोर्टाने आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढावा यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर मराठा आरक्षणावरील सुनावणीला हायकोर्टाने नकार दिला होता. त्यामुळे ही याचिका दुसऱ्या खंडपीठापुढे मांडण्यात आली.
संबंधित बातम्या :
दिल्लीत मोदी-पवार भेट, मराठा मोर्चांवर चर्चा
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र तयार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement