एक्स्प्लोर
मराठा मोर्चाचं वादळ आज उत्तरेकडे, बुलडाण्यात नि:शब्द क्रांतीचा हुंकार

बुलडाणा : पश्चिम महाराष्ट्रानंतर आता मराठा मोर्चांचं वादळ उत्तरेकडे वळलं आहे. बुलडाण्यातल्या मराठा मूकमोर्चासाठी विराट जनसागर उसळला होता. जयस्तंभ चौकातल्या मंचावरुन जिकडे नजर जाईल तिकडे मोर्चेकरांची गर्दी दिसत होती. गर्दी जास्त झाल्यानं आयोजकांनी जयस्तंभ चौकापर्यंत केवळ महिलांना प्रवेश दिला. तर पुरुष मंडळींना जयस्तंभ परिसराच्या बाहेरचं थांबवलं गेलं.
पाहा फोटो : बुलडाण्यात नि:शब्द क्रांतीचा हुंकार
इतर मोर्चांप्रमाणे हा मोर्चा कुठेच गेला नाही. मोर्चेकरांनी एकाच ठिकाणी बसून आपला निषेध मूकपणे नोंदवला आणि अखेर जिल्हाधिकाऱ्यांनीच आयोजनस्थळी येऊन आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं. रात्रीच्या पावसामुळे आयोजनस्थळी मोठा चिखल जमलेला असूनही महिलांनी शिस्तबद्धपणे याठिकाणी उपस्थिती लावली.आणखी वाचा























