एक्स्प्लोर

मनोज जरांगेंच्या 24 तारखेच्या आंदोलनावरुन हायकोर्टात खडाजंगी, गुणरत्न सदावर्ते आणि जरागेंच्या वकिलांचा टोकाचा युक्तिवाद, कोर्ट काय म्हणालं?

Bombay High Court : मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात डॉ. गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे.

Bombay High Court : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी शनिवारपासून (24 फेब्रुवारी 2024) आंदोलनाची हाक दिली आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात डॉ. गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या वतीनं जेष्ठ वकील विजय थोरात यांनी युक्तिवाद केला. 

जनतेला वेठीस धरणं योग्य नाही - महाधिवक्ता

मनोज जरांगेंनी आता राज्यभरात तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. अश्याप्रकारे आंदोलनातून प्रशासन आणि जनतेला वेठीस धरणं योग्य नाही, असे सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं. कोर्टाच्या निर्देशांनुसार मनोज जरांगेंनी वैद्यकीय उपचार घेतले आहेत, असेही सरकारी वकील म्हणाले. 

प्रशासनाला भिती असेल तर त्यांनी रितसर नोटीस पाठवावी - 

राज्य सरकारनं याचिकाकर्त्यांसाठी युक्तिवाद करू नये. आम्हाला प्रशासनानं कुठलीही नोटीस पाठवलेली नाही, मनोज जरांगे यांच्या वतीनं जेष्ठ वकील विजय थोरात यांनी कोर्टात युक्तिवाद केला. जरांगे हे उपोषणाला बसले आहेत, अद्याप कुठेही हिंसाचार झालेला नाही. प्रशासनाला भिती असेल तर त्यांनी रितसर नोटीस पाठवावी, असे ते म्हणाले.  

बंद आणि तीव्र आंदोलनाची हाक मराठा आंदोलक समितीनं दिली आहे. मनोज जरांगे यांनी व्यक्ती म्हणून अशी घोषणा केलेली नाही, अशी माहिती मनजो जरांगेंचे वकील विजय थोरात यांनी माहिती दिली. राज्य सरकार याप्रकरणी हतबल झालीय, अशी परिस्थिती राज्यात कधीही नव्हती, असा दावाही यावेळी जरांगेंच्या वकिलांनी केला. 

मनोज जरांगेंना बदनाम करण्याचा हा डाव आहे. त्यांचं आंदोलन हे सध्या शांततेतच सुरू आहे. राज्य सरकारला आंदोलनाचा विरोध आपल्या अंगावर घ्यायचा नाही. एखादा याचिकाकर्ता उभा करून ते कोर्टाकडून निर्देश मागत आहेत, असा आरोप जरांगेंचे वकील विजय थोरात यांनी केला. 

याचिकाकर्ते सदावर्तेंनी काय युक्तीवाद केला ?

जरांगेंचा हा दावा चुकीचा आहे. कोर्टातील हमीनंतरही जरांगेंची चिथावणी सुरूच आहे. 24 फेब्रुवारीपासून त्यांनी राज्यभरात चक्काजाम आणि तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. मनोज जरांगेंनी मीडियात पत्रकार परिषद घेत आंदोलनाचा सारा प्लान जाहीर केलाय, अशी माहिती याचिकाकर्ते सदावर्तेंनी कोर्टात युक्तिवाद केला. 

कोर्ट काय म्हणाले ?

विरोध करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, मात्र त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही ही देखील तुमची जबाबदारी असल्याचं हायकोर्टानं मनोज जरांगे यांच्या वकिलांना सांगितलं. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSharad Pawar Full PC : अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
×
Embed widget