मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेला 288 जागा लढवाव्या, प्रकाश आंबेडकरांचा सल्ला
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 288 जागांवर विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) लढवली पाहिजे असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केले.
Prakash Ambedkar : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 288 जागांवर विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) लढवली पाहिजे. ते लढतीलही अशी अपेक्षा असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केले. ते आज नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. 20 जुलैनंतर 288 जागांवरील उमेदवार पाडायचे की निवडून आणायचे हे ठरवू असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले होते. यावर आंबेडकरांनी त्यांनी 288 जागांवर निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे.
चंद्रकांत हंडोरेंना कोणी पाडलं? त्याच्यावर कारवाई होणार का?
विशाळगडाचा वादावर आंबेडकर यांनी थेट महाविकास आघाडीला विचार असे म्हणाले. काँग्रेसच्या 7 आमदारांवर क्रॉस वोटिंगचा आरोप केला आहे. तो आरोप चुकीचा असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. राज्यसभेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांना ज्या आमदारांनी पाडले त्यांची नावे काँग्रेसला माहीत आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल काँग्रेस पक्षाला प्रकाश आंबेडकर यांनी विचारला. काँग्रेस कारवाई करणार का? की त्यांच्यातील मनुवाद पुन्हा बाहेर येणार का असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात देखील प्रसारमाध्यमांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जी परिस्थिती उद्भवणार आहे, त्याबाबत आम्ही कार्यकर्त्याला माहिती देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान, पुण्यातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणारे वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी माझ्याशी संपर्क केला होता. पक्ष सोडताना ते माझ्याशी बोलल्याचे आंबेडकर म्हणाले.
फोनवरील संभाषण कॅमेऱ्यात कैद
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) आज नांदेडमध्ये (Nanded) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी फोनवर बोलतानाचे त्यांचे संभाषण कॅमेऱ्यात कैद झाले आहे. 'मै अभी नांदेड मै हु अशोक चव्हाण (Ashok Chavan) को तुम्हारे पास लेके आ रहा हु, नही तो क्या रहा उसमे, तुमने किमा बना दिया उसका' असे प्रकाश आंबेडकर फोनवर बोलत होते. ते कोणाशी बोलत होते, याबाबतची माहिती मिळाली नाही. मात्र, त्यांचे संभाषण कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
Manoj Jarange on Prakash Ambedkar : 'भेसळ शब्द देण्यापेक्षा बोगस आरक्षण दिलं गेलं', मनोज जरांगेंचे प्रकाश आंबेडकरांचे जशास तसे प्रत्युत्तर