Manoj Jarange on Prakash Ambedkar : 'भेसळ शब्द देण्यापेक्षा बोगस आरक्षण दिलं गेलं', मनोज जरांगेंचे प्रकाश आंबेडकरांचे जशास तसे प्रत्युत्तर
Manoj Jarange on Prakash Ambedkar : "सगे सोयरे ही भेसळ आहे. ओरिजनल मंडल कमिशनची यादी जोडल्या गेली होती. 1993 मध्ये कुणबी समाजाला आरक्षण दिले गेले, ते शाबूत आहे"
Manoj Jarange on Prakash Ambedkar : "सगे सोयरे ही भेसळ आहे. ओरिजनल मंडल कमिशनची यादी जोडल्या गेली होती. 1993 मध्ये कुणबी समाजाला आरक्षण दिले गेले, ते शाबूत आहे. मात्र इतर मार्गाने सध्या काही जण मिळवू पाहात आहेत. घाई घाईत आता काढलेली कुणबी सर्टिफिकेट रद्द करा, ज्यांनी अर्ज केलेले आहेत नोंदीप्रमाणे त्यांना मिळून जातील", असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
कायद्याला, संविधानाला धरुन प्रकाश आंबेडकर साहेबांनी बोलणे अपेक्षित आहे. 50 टक्क्यांच्या वर 2 टक्के गेलंय. त्याला भेसळ शब्द देण्यापेक्षा बोगस आरक्षण दिलं गेलंय. जे खरं नाही, जे खोटं दिलंय. छगन भुजबळ ते बोगस आरक्षण खायला लागले आहेत. त्याच्यावरही त्यांनी संविधानावर बोलणे अपेक्षित आहे. एका बाजूने बोलण्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांनी चौफेर बोलावे. बरोबर बोलले ते, आम्हीच ओबीसीत आहे. मराठा समाज हाच ओबीसीत आहे, कुणबी हा पण ओबीसीत आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. ओबीसीमध्ये मराठ्यांचं हक्काच आरक्षण आहे कोणालाही धक्का लागत नाही.
मनोज जरांगे पुढ बोलताना म्हणाले, गरीब मराठ्यांना आरक्षण न देण्यास श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे, आम्ही पण तेच म्हणतो ना, ही गरिबांची लढाई आहे. गरीब मराठ्यांचे लेकर मोठे व्हावे हे 70 वर्षात कोणत्याच पक्षातल्या नेत्यांना वाटलं नाही. श्रीमंत मराठा म्हणण्यापेक्षा जे सत्ताधारी होते जे राजकारणात होते. यांच्या मनात गोरगरिबांना मोठे होऊ देऊ हे नव्हतं. म्हणून तर मी गरीब माझा समाज गरीब म्हणून आम्ही गरिबांनीच ही लढाई उभा केली. श्रीमंत आपल्याला कधीच मोठं करणार नाही. म्हणून आमची लढाई आम्ही उभे केले आणि जिंकत आणली. मी मात्र आणि माझा गरीब मराठा ओबीसीतून आरक्षण घेणार म्हणजे घेणार आहे.
जे 16 टक्के आरक्षण एक्स्ट्राचं दिलं ते मंडल कमिशनला सोडून दिले
मंत्र्यांनी न्यायाधीशांनी आणि कायद्याच्या अभ्यासाकांनी मिळून ठरवलेली आहे. आणि ती पक्की आहे आणि टिकणार सुद्धा त्याच्यात सगळ्या जाती-धर्मांना न्याय मिळणार आहे. ते जर भेसळ असेल तर 50% च्या वर दोन टक्के दिलेल आहे ही भेसळच असणार आहे. जे 16 टक्के आरक्षण दिलं एक्स्ट्राचं ते मंडल कमिशनला सोडून दिले. हे वरचं पण भेसळच आहे, हे पण जायलाच पाहिजे उडायलाच पाहिजे. 180 जाती आरक्षणात घातल्या होत्या आता साडेतीनशे-चारशे जाती झाल्या,त्याही भेसळ असतील मग घातलेल्या. त्याच्यावरही आंबेडकर साहेबांनी बोलायला पाहिजे एक्सट्रा जाती कुठून आल्या. प्रकाश आंबेडकर साहेबांनी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा बोगस शब्द वापरू आपण...एक्स्ट्राचजे आरक्षण घेतले ते पण उडायला पाहिजे. वरील दोन टक्के आरक्षण जायला पाहिजे 50% आतच राहायला पाहिजे. बोगस आरक्षण जे खायला लागले छगन भुजबळ आणि ते पण जायला पाहिजे. त्याच्यावर त्यांनी संविधानाला धरून बोलणं अपेक्षित आहे, असं आवाहनही मनोज जरांगेंनी केलं.
प्रकाश आंबेडकरांना मी कायम मानतो पुढेही मानत राहणार आहे
प्रकाश आंबेडकरांना कायम मानतो पुढेही मानत राहणार आहे. मराठा समाज संपवावा किंवा त्यांना आरक्षण मिळू नये याबाबतीचे शब्द त्यांच्याकडून येऊ नये. त्यांच्याकडून सगळ्यांना सारखं चौफेर टाईट बोलण्यात यावं. सगळ्यांची सारखी बाजू त्यांच्याकडून मांडण्यात आली पाहिजे. ही जनतेची अपेक्षा आहे त्यापेक्षा माझी जास्त आहे. त्यांनी जनतेची बाजू मांडणे गरजेच आहे. 50% वर गेलेले दोन टक्के ती पण उडा म्हणायला पाहिजे. म्हणजे ते जनतेची बाजू घेऊन बोलायला लागली हे सिद्ध होईल, असंही मनोज जरांगे यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Ajit Pawar vs Sharad Pawar : शरद पवारांची अजितदादांना पुन्हा धोबीपछाड, दादांच्या बालेकिल्ल्यातील शहाराध्यक्षांसह चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 20 जुलैला तुतारी फुंकणार