Manoj Jarange Patil on Ajay Baraskar : अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप, हा भोंदू महाराज, आंदोलन संपवण्याचा डाव; मनोज जरांगे पाटलांचा कडाडून हल्लाबोल
Manoj Jarange Patil : जय बारसकर यांनी केलेल्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी हा सरकारी ट्रॅप असल्याचा आरोप केला. हा भोंदू महाराज असल्याची सडकून टीका जरांगे पाटील यांनी केली.
Manoj Jarange Patil : अजय बारसकर यांनी केलेल्या टीकेनंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज असल्याची सडकून टीका जरांगे पाटील यांनी केली. अजय बारसकर यांनी केलेल्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी हा सरकारी ट्रॅप असल्याचा आरोप केला. तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट असल्याचा घणाघातही जरांगे पाटील यांनी बारसकर यांनी केलेल्या आरोपांवरून केला. बावळटकर बाबाला उत्तर सुद्धा देणार नाही, काय बोंबलायचं ते बोंबल, अन्यथा याला वेगळं वळण लागू शकतं, असा इशाराही त्यांनी दिला. सगसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील त्यांनी केली.
तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा डाव
जरांगे पाटील यांनी अजय बारसकर यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, मराठा समाजाचं वाटोळं करू नका. तुकाराम महाराजांबद्दल बोललो असल्यास माफी मागतो, हवं तर तोंडावर मारून घेतो, बारसकरांची माफी मागणार नाही. मला पाणी पाजून त्याला मोठं व्हायचं होतं, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
आरक्षण आंदोलन संपवण्यासाठी डाव
मराठा आरक्षण आंदोलन संपवण्यासाठी हा ट्रॅप असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. एक ट्रॅप झाला असून त्यावेळी त्याला जागा मिळाली नाही हा दुसरा ट्रॅप असून प्रत्येकवेळी कोणीतरी घुसवण्याचा डाव आहे. सरकारचा ट्रॅप सुरु झाला असून सरकारने ट्रॅप बंद करावेत. अजून 16 ते 17 ट्रॅप असून सरकार यांना मायाजाळ्यात अडकवत आहे, आमिष दाखवून भुलवत असल्याचा आरोप त्यांनी केला. या दोन चार जणांना आंदोलनात काही मिळवायच होतं, ते मिळाले नसेल. मुख्यमंत्र्यांच्या पीएसोबत आला होता. आतापर्यंत त्यांना मी 6 महिने गोड होतो. त्यांना ट्रॅप करायचा होता, त्यात शिंदे साहेबांचा आणि त्याचा एक माणूस होता. शिंदे साहेबांचा प्रवक्ता देखील आहे. तो मला बदनाम करण्याचा सरकारचा ट्रॅप होता.
मनोज जरांगेंनी स्पष्ट केली आंदोलनाची दिशा
दरम्यान, 24 फेब्रुवारीपासून महाराष्ट्राततील प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलन होईल, सकाळी साडे दहापासून एकपर्यंत हे आंदोलन होईल, अशी घोषणा त्यांनी केली. आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांनी आमच्या घरासमोरून जायचं नाही. 1 तारखेला वृद्ध नागरिकांना घेऊन आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. कोणी आमदार आमच्या मुलांवर जाणून बुजून अन्याय करेल, तर त्यांना जाब विचारला जाईल, असेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या