एक्स्प्लोर

मनोज जरांगे खोटारडा माणूस, रोज पलटी मारतो, त्याच्या अनेक गुप्त बैठका, अजय महाराज बारसकरांचे गंभीर आरोप

Ajay Maharaj Baraskar vs Manoj Jarange : अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी जरांगेंवर (Manoj Jarange) तुफान हल्लाबोल केला. मनोज जरांगे हे रोज पलटी मारतात, रोज खोटं बोलतात असा आरोप बारसकर यांनी केला.

Ajay Maharaj Baraskar vs Manoj Jarange मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील लढाईमधील  महत्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी जरांगेंवर (Manoj Jarange) तुफान हल्लाबोल केला. मनोज जरांगे हे रोज पलटी मारतात, रोज खोटं बोलतात असा आरोप बारसकर यांनी केला. अजय बारसकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, जरांगे पाटलांवर घणाघाती टीका केली. 

अजय महाराज बारसकर काय म्हणाले? (Ajay Maharaj Baraskar on Manoj Jarange)

मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी मीदेखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो. मी यापूर्वी कधीच  माध्यमासमोर आलो नाही. मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही. तो हेकेखोर आहे, कोणत्याही शब्दावर अडून राहायचा. आमचा समाज खूप भोळा आहे. मी यापूर्वी सामाजिक विभागासोबत जरांगे यांना मसुदा समजवायचो. यापूर्वी त्यांनी मी सगळं सांगत असताना महाराज साक्षी आहे ते सांगत होते (असा व्हिडिओ त्यांनी दाखवला )

मी जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षी आहे. मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी आरोप करतोय असं बिलकुल नाही. मी कीर्तनाचे वगैरे पैसे घेत नाही.
आताच हे का झालं तर काही दिवसापासून माझ्या मनातील खदखद व्यक्त केली. 

मला अनेक फोन येत आहेत, गोळ्या घालून मारू. माझं काम सत्य सांगणं आहे. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला. तो मी सहन करणार नाही. जरांगे यांना लोकं पाणी प्या म्हणत होते, तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो. मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्याने, मी मोठा होईल म्हणून नाय प्यायला. मला तिथे म्हणाला संत फिंत गेले खड्यात. तिथून माझा वाद सुरु झाला

जरांगेंच्या मुलांमध्येही अहंकार

जरांगेची मुलगी म्हणते माझ्या बापाच्या देव पाया पडेल. इतका अंहकार मुलांमध्येही आहे. सांगा हा देवापेक्षा मोठा आहे का? हा माझ्यावर आरोप करतो सरकार आणि भुजबळ यांचा माणूस. माझा आणि कोणाचा संबंध नाही. आरक्षण संबंध याने सांगतो. आजपर्यंत एकही पत्र सरकारला त्याने स्वतः दिलं नाही. रोज पलटी मारतो तो. सगळ्या मीटिंग कॅमेरावर करतो, याला घोडा लावतो त्याला घोडा लावतो म्हणतो.

जरांगेंच्या अनेकांशी गुप्त मीटिंग

 23 डिसेंबरला गुप्त मिटिंग काहींसोबत यांनी केली. मी साक्षी आहे. रांजन गाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मीटिंग केली. लोणावळा, वाशी  येथे ही समाजाला वगळून मीटिंग केली. वाशी आंदोलन इथंवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो, मात्र त्यांच्या मीटिंगमुळे मला आक्षेप होता. जरांगेला काडीची अक्कल नाही. पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे. अर्धवट ज्ञान बेक्कार असतं म्हणतो पण स्वतःचं काय. सगळ्या अधिकारी यांच्यासोबत हा मिटिंग घेत होता.  

VIDEO :  अजय महाराज बारसकर यांचे मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप

y

संबंधित बातम्या 

रोज उठायचं अन् राज्यातील प्रत्येक गावात रास्ता रोको करायचं; मनोज जरांगेंच्या आंदोलनाची दिशा ठरली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget