Manoj Jarange : आरक्षणासाठी आंदोलनाचं नेतृत्त्व मनोज जरांगेंकडे, मराठा आरक्षण हक्क परिषदेत ठराव
Maratha Reservation : मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याविषयी विरोधी भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मतदान न करण्याच्या देखील निर्णय घेण्यात आला आहे.
![Manoj Jarange : आरक्षणासाठी आंदोलनाचं नेतृत्त्व मनोज जरांगेंकडे, मराठा आरक्षण हक्क परिषदेत ठराव Manoj Jarang led the protest for Maratha reservation Decision in the Maratha Reservation Rights Conference Manoj Jarange : आरक्षणासाठी आंदोलनाचं नेतृत्त्व मनोज जरांगेंकडे, मराठा आरक्षण हक्क परिषदेत ठराव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/14/88c986ec4ce56195778b64eaa21406c01699956060135737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मराठा आरक्षणासाठीचं (Maratha Reservation) नेतृत्व यापुढे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे देण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वितीने घेण्यात आला आहे. मुंबईत मराठा आरक्षण हक्क परिषदेत याबाबत ठराव घेण्यात आला आहे. सोबतच मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याविषयी विरोधी भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर,वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्यावर बहिष्कार घालण्याचा देखील यावेळी ठराव घेण्यात आला आहे.
दरम्यान यावेळी बोलतांना गंगाधर काळकुटे म्हणाले की, "मराठा आरक्षण हक्क परिषद आयोजीत करण्याचे कारण म्हणजे, सध्या ओबीसी नेते प्रतिमोर्चे काढत आहेत. तसेच मराठा आरक्षण कसं मिळू शकेल याबाबत या परिषदेत चर्चा होणार आहे. तसे ठराव देखील यानिमित्ताने पास करण्यात येतील. तसेच, मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचं नेतृत्त्व मनोज जरांगेंकडे देण्याचा ठराव देखील या मराठा आरक्षण हक्क परिषदेत घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. तसेच, जातनिहाय जणगणना व्हायला हवी, मराठा समाज नेमका किती आहे हे लक्षात येईल, अशी मराठा आरक्षण हक्क परिषदेने सरकारकडे मागणी केली असल्याचे," काळकुटे म्हणाले.
मराठा आरक्षण हक्क परिषेदेतील ठराव...
- यापुढे मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या आंदोलनचं नेतृत्व करतील.
- कुणबी दाखले देऊन किंवा ओबीसीतून आरक्षण द्यावं. तसेच लोकसंख्येनुसार आरक्षण देण्यात यावे.
- आत्तापर्यंत आरक्षण कसं दिलं गेलं त्याची श्वेतपत्रिका सरकारने काढावी.
- ओबीसी आरक्षण फेरतपासणी व्हायला हवी.
- मराठा-ओबीसी वाद निर्माण करणारे छगन भुजबळ यांना आम्ही मतदान करणार नाही, आम्ही त्यांच्यावर आणि वकील सदावर्ते यांच्यावर बहिष्कार टाकत आहोत. सदवर्ते दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत.
- 1994 साली शरद पवार यांनी ओबीसी समाजाला आरक्षण दिलं होतं. त्यावेळी त्यांनी कुठल्या आधारावर तो निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे मित्र असून, त्यांनी त्यांच्या मदतीने मराठा समाजाला आरक्षण द्यावं.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदावर्ते यांना बोलायला लावलं आहे का? त्याचं काही ठरवून आहे का?, याबाबत त्यांनी स्पष्टता द्यावी.
- जातनिहाय जणगणना व्हायला हवी. मराठा समाज नेमका किती आहे हे लक्षात येईल.
- मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)