एक्स्प्लोर

Manoj Jarange : जरांगेंची तोफ पुन्हा धडाडणार, सोलापुरात तब्बल 125 एकरवर सभेची तयारी; पण निशाण्यावर कोण असणार?

Manoj Jarange : मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करत असून, पहिल्याच दिवशी म्हणजेच उद्या सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 या ठिकाणी जरांगेंची भव्य सभा होत आहे.

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, या दरम्यान 15 नोव्हेंबरपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी म्हणजेच उद्या (15 नोव्हेंबर) सोलापूरच्या (Solapur) करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 या ठिकाणी जरांगेंची भव्य सभा होत आहे. तर, तब्बल 125 एकर शेतात या सभेचं नियोजन करण्यात येत आहे. तसेच, सकल मराठा समाजाच्या वतीने या सभेची तयारी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज सभास्थळाची पाहणी करण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात वांगी नंबर 1 या ठिकाणी मनोज जरांगे पाटिल यांची उद्या तोफ धडाडणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील एक लाख मराठा बांधव या सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. तर, तब्बल 125 एकर शेतात होणाऱ्या या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. सभेच्या ठिकाणी मराठा बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची, रुग्णवाहिका आणि डॉक्टर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. उजनी जलाशयाच्या नैसर्गिक सानिध्यात आयोजित करण्यात आलेली ही सभा संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. तर, उद्या होणाऱ्या या सभेची सकल मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांकडून आणि आयोजकांकडून आज पाहणी करण्यात आली.

जरांगे कोणावर निशाणा साधणार? 

मनोज जरांगे यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सभेत सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर मागील काही दिवसात मनोज जरांगे यांच्याकडून ओबीसी नेत्यांवर देखील टीका केली जात आहे. विशेष करून मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजयी वेडट्टीवार जरांगेंच्या निशाण्यावर आहे. त्यातच, भोकरदनमध्ये गाव बंदीचे बॅनर फाडल्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देखील जरांगे नाव न घेता टीका करत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील या सभेतून जरांगे आता कुणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनोज जरांगेंचा महाराष्ट्र दौरा (तिसरा टप्पा) 

15 नोव्हेंबर 2023 (बुधवार)

सकाळी 11 वाजता : अंतरवाली सराटी 
दुपारी 4.30 वाजता : वाशी
रात्री 7.30 वाजता : परांडा

16 नोव्हेंबर 2023 (गुरुवार)

सकाळी 11 वाजता : करमाळा
दुपारी 5 वाजता :  दौंड

17 नोव्हेंबर 2023 (शुक्रवार)

सकाळी 10 वाजता : मायणी
दुपारी 2 वाजता :  सांगली
दुपारी 5 वाजता :  कोल्हापूर
रात्री 8 वाजता :  इस्लामपूर

18 नोव्हेंबर 2023 (शनिवार)

सकाळी 10 वाजता : कराड
दुपारी 1 वाजता : सातारा
दुपारी 4 वाजता : मेढा
रात्री 10 वाजता : वाई

19 नोव्हेंबर 2023 (रविवार)

सकाळी 9 ते 11 : पाचाड ते रायगड
रात्री 7 वाजता : रायगड-मुळशी-आळंदी

20 नोव्हेंबर 2023 (सोमवार)

सकाळी 9 वाजता: आळंदी
सकाळी 11 वाजता : तुळापूर
दुपारी 3 वाजता : पुणे
सायं. 6 वाजता : खालापूर

21 नोव्हेंबर 2023 (मंगळवार)

सकाळी 10 वाजता: कल्याण
दुपारी 3 वाजता : ठाणे
रात्री 8 वाजता : पालघर

22 नोव्हेंबर 2023 (बुधवार)

सकाळी 11 वाजता : त्रंबकेश्वर
दुपारी 3 वाजता : विश्रांतं
सायं. 6 वाजता : संगमनेर

23 नोव्हेंबर 2023 (गुरुवार)

सकाळी 10 वाजता : श्रीरामपूर
दुपारी 1 वाजता : नेवासा
दुपारी 5 वाजता : शेवगाव
सायं. 7 वाजता : धोंडराई

इतर महत्वाच्या बातम्या: 

'आता याला थेट पंढरपूरचाच झेंडा उचलायला लावणार'; पाहिल्याचं सभेत जरांगेंचा इशारा कुणाला?

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Solapur News: सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Embed widget