एक्स्प्लोर
माझा इम्पॅक्ट : कोपर्डीतील बससेवा पुन्हा सुरु होणार!
एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर एसटी महामंडळाने हे पाऊल उचललं आहे.
अहमदनगर : कोपर्डीतील बससेवा पुन्हा सुरु करु, असं आश्वासन श्रीगोंदा आगार प्रमुखांनी दिलं आहे. नागरिकांशी चर्चा करुन सोमवारी बस पुन्हा सुरु करु, अशी माहिती त्यांनी दिली. एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर एसटी महामंडळाने हे पाऊल उचललं आहे.
गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि आणि ग्रामस्थांशी श्रीगोंदा आगार प्रमुख सुधीर सुतार यांनी संवाद साधला. कोपर्डी खटल्याचा निकाल लागताच दुसऱ्या दिवशीच श्रीगोंदा ते कोपर्डी ही बससेवा परिवहन महामंडळाने बंद केली होती.
विशेष म्हणजे, याबाबत परिवहन विभागाकडून याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. बससेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचं वृत्त एबीपी माझाने दाखवलं होतं. या वृत्ताची गंभीर दखल घेत एसटी महामंडळाने त्वरित कोपर्डीला भेट दिली.
संबंधित बातमी : कोपर्डीचा निकाल लागताच श्रीगोंदा ते कोपर्डी बससेवा बंद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement