एक्स्प्लोर

होय, मोठी अस्वस्थता मनात आहे: मुख्यमंत्री

राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ या कार्यक्रमात सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला.

मुंबई: “मागील तीन वर्षाच्या कामगिरीकडे वळून पाहताना केलेल्या कामाचं समाधान आहे, मात्र राहिलेल्या कामाबद्दल मोठी अस्वस्थता मनात आहे. खूप कामं करायची आहेत. हाती घेतलेली कामं येत्या दोन वर्षात पूर्णपणे ताकद लावून पूर्ण करायची आहेत. ही कामं पूर्ण करण्याचं आव्हान आहे, मात्र ती पुढील दोन वर्षात नक्की पूर्ण करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ या कार्यक्रमात बोलत होते. राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ या कार्यक्रमात सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?  हा प्रश्न विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षात केलेल्या कामाचा आढावा मांडला. शेती आणि सिंचन मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यातील शेतीसमोरची आव्हानं मोठी होती ती आजही आहेत. शेती शाश्वत केल्याशिवाय आत्महत्या थांबणार नाहीत. त्या दृष्टीने सरकारने काम केलं. राज्यातील शेतकरी एकावेळी दोन-तीन पिकं घेतो. तीन वर्षात शेती क्षेत्रातील गुंतवणुकीत तीन पटीने वाढ झाली. आत्महत्या आम्हाला मिळालेली लिगसी, या आत्महत्या आज सुरु झाल्या नाहीत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शाश्वत कार्यक्रम गरजेचे, शेती शाश्वत झाल्यानंतर आत्महत्या थांबतील. शेतीचा विकासदर 12 टक्क्यांनी वाढला. सिंचनावर पूर्वी फक्त पैसे खर्च व्हायचे, आता रेकॉर्डब्रेक सिंचन प्रकल्प सुरु केले” पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक राज्य सरकारने गेल्या तीन वर्षात पायाभूत सुविधांवर सर्वाधिक खर्च केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
  • सगळ्यात जास्त भर इन्फ्रास्ट्रक्चर दिला आहे. सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च महाराष्ट्रात होतो.
  • पायाभूत सुविधांवर सर्वाधिक भार, भारतातील पायाभूत सुविधांचे जास्त प्रकल्प महाराष्ट्रात
  • निती आयोगाचा रिपोर्ट, सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात
  • परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल आहे, देशातील एकूण FDI पैकी 1 लाख 29 हजार कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात
  • सर्वाधिक शौचालयं महाराष्ट्रात, 45 लाख शौचालय बांधली
  • रस्ते, रेल्वे मार्गांची कामं मोठ्या प्रमाणावर सुरु
  • नवी मुंबई, नागपूर, शिर्डी अशा सर्वच विमानतळांची काम सुरु केली.
  • गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात जी रेल्वेची कामं बंद होती, ती सुरु केली.
  • पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सगळ्यात जास्त ग्रामीण घरं महाराष्ट्रात
  • डिजिटायझेशनमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
  • शिक्षणात 18 व्या क्रमांकावर होतो, आता 3 ऱ्या क्रमांकावर आलो, आता पहिल्या क्रमांकावर येऊ.
  • मुंबईत मेट्रोचं काम सुरु, एप्रिल 2018 पासून रो-रो सेवा मिळणार
2019 पर्यंत बीडमध्ये रेल्वे नेणार म्हणजे नेणार येत्या दोन वर्षात म्हणजेच 2019 पर्यंत बीडमध्ये रेल्वे नेणार म्हणजे नेणार असा विश्वास यावेळी मुख्यंत्र्यांनी व्यक्त केला. फेरीवाल्यांवरुन मराठी-अमराठी वाद बदमाशी मुंबईत सध्या फेरीवाल्यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “अवैध फेरीवाले हटवलेच पाहिजेत. त्यांना काढलं जाईल. सरकार ते काम करेल. मात्र फेरीवाला प्रकरणाला मराठी-अमराठी चेहरा देणं चुकीचं आहे. ही शुद्ध राजकीय बदमाशी आहे. त्याचवेळी फेरीवाल्यांकडून मारहाण होणंही अयोग्य आहे. मारहाण करणाऱ्यांना सोडणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. फेरीवाला धोरण तयार करुन त्यांचे नियम बनवण्यात आले आहेत. त्यानुसार, बीएमसी शक्य त्यांना कायमस्वरुपी परवाना देईल आणि शक्य नाही त्यांना हटवणार आहे. अनधिकृत फेरीवाले हटवलेच पाहिजेत आणि कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आम्ही सगळंच केलं नाही, पण योग्य दिशेने मुख्यमंत्र्यांनी यावेळी आम्ही सगळंच केलं असं म्हणणार नाही, पण आम्ही योग्य दिशेने जात आहोत, असं नमूद केलं. अनेक काम सुरु आहेत, ती येत्या काळात पूर्ण होतील, अनेक रखडलेली आहेत त्यांना चालना देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं. उद्धव ठाकरेंसोबतच्या संवादासाठी बैठकीची गरज नाही उद्धव ठाकरेंसोबत संवाद साधण्यासाठी बैठकांची गरज नाही, आम्ही योग्यरितीने संवाद साधतो, आम्हाला मध्यस्थांची वा बैठकांची गरज भासत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच मी कपटी मित्र कुणालाही म्हटलं नाही आणि आमच्या मित्राला तर नाहीच नाही, असंही स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं. काहींना टीका करण्याची सवय सरकारच्या सर्व निर्णयावर टीका करण्याची मित्रपक्षाच्या काही नेत्यांना सवय आहे. सरकारमध्ये राहून सरकारवर टीका करायची, विरोधकांची भूमिका पार पाडायची, त्याचवेळी स्वपक्षाकडून शाबासकी मिळेल अशी अपेक्षा असते, मात्र ही भूमिका योग्य नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
  • विरोधी पक्ष आणि सत्ताधारी, असा दोन्ही स्पेस घेतल्यास लोकांना आवडत नाही, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर निशाणा
शिवसेनेसोबत योग्य समन्वय शिवसेनेसोबत आमचा योग्य समन्वय आहे. मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने निर्णय घेतो. केवळ थेट सरपंच निवडीला शिवसेनेने विरोध केला. त्यावेळी बहुमत घेण्यात आलं. मात्र तो निर्णय वगळता, सर्व निर्णय एकमताने घेतले, असं मुख्यमंत्री म्हणाले. म्हणून राष्ट्रवादीशी संवाद विधानपरिषदेत राष्ट्रवादी मोठा पक्ष आहे. त्यामुळे एखादा कायदा पास करण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करावी लागते. शिवसेनेमुळे राष्ट्रवादीला जवळ करतोय असं अजिबात नाही, विधान परिषदेत आमचं बहुमत नाही, त्यामुळे संवाद ठेवण्याची गरज असते. राजकीय समन्वय साधून संवाद ठेवावा लागतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना नाकारणार नाही कर्जमाफीमध्ये घोटाळे होऊ नये म्हणून प्रचंड अभ्यास केला. कर्जमाफीसाठी आम्ही कोणत्याही शेतकऱ्याला नाकारत नाही, त्रुटी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांशी संपर्क साधू. जो शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे, तो व्यापाऱ्याला जातोय, हे घोटाळे आम्ही रोखतोय, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मिलिंद  नार्वेकर भला माणूस, पण माझे इतके वाईट दिवस नाहीत नारायण राणेंना मंत्रिमंडळात घेऊ नये यासाठी शिवसेनेने अल्टिमेटम दिल्याच्या बातम्यांबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, "माध्यमात अशा बातम्या कुठून येतात समजत नाही. शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर चिठ्ठी घेऊन अल्टिमेटम देतात अशा बातम्या येतात. पण उद्धवजी आणि माझ्यात चांगला संवाद आहे. मिलिंद नार्वेकर माझ्याकडे प्रस्ताव घेऊन येतील इतके माझे वाईट दिवस नाहीत. अर्थात मिलिंद  नार्वेकर भला माणूस आहे, पण माझ्यावर अजून तशी वेळ आलेली नाही, अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी मारली. नारायण राणे, एकनाथ खडसेंचं काय? नारायण राणेंना मंत्रिमंडळात घेणार का, याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं. तर एकनाथ खडसेंची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यांचा चौकशी अहवाल आम्ही सभागृहात सादर करु, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या व्हिजनमधील मुद्दे
  • मिलिंद नार्वेकरांना चिठ्ठी पाठवून अल्टिमेटम देणं, इतके माझे वाईट दिवस आले नाहीत.
  • काही गोष्टी अयोग्य असतील, पण अंजली दमानियांच्या हेतूवर शंका नाही
  • खडसेंच्या चौकशीचा अहवाल आम्ही सभागृहात सादर करु
  • घोटाळ्यांमध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, कोणालाही सोडणार नाही
  • महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमुळे विरोधकांच्या कार्यक्रमाला उपस्थिती
  • राजकीय संवाद म्हणून विरोधकांच्या कार्यक्रमांना हजेरी
  • जो शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे, तो व्यापाऱ्याला जातोय, हे घोटाळे आम्ही रोखतोय
  • कर्जमाफीसाठी आम्ही कोणत्याही शेतकऱ्याला नाकारत नाही, त्रुटी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांशी संपर्क साधू
  • कुपोषणाचा प्रश्न गंभीर, या प्रश्नांच्या मुळाशी जाणं आवश्यक
  • कर्जमाफीमध्ये घोटाळे होऊ नये म्हणून प्रचंड अभ्यास केला.
  • अवैध फेरीवाले हटवलेच पाहिजेत. त्यांना काढलं जाईल. सरकार ते काम करेल.
  • फेरीवाला प्रकरणाला मराठी-अमराठी चेहरा देणं, शुद्ध राजकीय बदमाशी आहे.
  • मुंबई बशीसारखी, जोराचा पाऊस आल्यावर पम्प केल्याशिवाय पाणी बाहेर जात नाही.
  • आर्थिक स्थिती भक्कम आहे असं नाही, पण स्थिती वाईटही नाही
  • कर्ज किती वाढलं हे महत्त्वाचं नाही, कर्ज किती फेडू शकतो हे महत्त्वाचं
  • आता सर्वात स्वस्त सोशल मीडिया, त्यावर पैसा खर्च कऱण्याची गरजच नाही
  • महाराष्ट्राचा विकास दर 10 टक्के आहे
  • महाराष्ट्राच्या जाहिरातीचं बजेट 50 कोटी, 300 कोटी हा आकडा चुकीचा
  • घोटाळ्यांच्या चौकशीवरुन दुर्लक्ष नाही, सिंचन घोटाळ्यांची चौकशी सुरुच
  • शिवसेनेमुळे राष्ट्रवादीला जवळ करतोय असं अजिबात नाही, विधान परिषदेत आमचं बहुमत नाही, त्यामुळे संवाद ठेवण्याची गरज
  • विधानपरिषदेत राष्ट्रवादी मोठा पक्ष, त्यामुळे एखादा कायदा पास करण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करावी लागते.
  • विरोधी पक्ष आणि सत्ताधारी, असा दोन्ही स्पेस घेतल्यास लोकांना आवडत नाही, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर निशाणा
  • पूर्वी बाळासाहेब होते, चर्चा व्हायची, अलिकडे काही नेत्यांना सरकारवर टीका करण्याची सवय
  • थेट सरपंच निवडीला शिवसेनेने विरोध केला, मात्र तो निर्णय वगळता, सर्व निर्णय एकमताने घेतले
  • सरकारच्या सर्व निर्णयावर टीका करण्याची मित्रपक्षाच्या काही नेत्यांना सवय
  • मी कपटी मित्र कुणालाही म्हटलं नाही आणि आमच्या मित्राला तर नाहीच नाही.
  • पवारसाहेबांना या वयात मैदानात उतरावं लागतंय हे सुदैवी की दुर्दैवी त्यांनीच ठरवावं
  • शिवसेना असो किंवा भाजप, प्रत्येक प्रश्नावर मंत्र्यांसोबत उतरतो.
  • प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना मी दिसतो, कारण या सरकारमध्ये आम्ही सामूहिकरित्या काम करतो.
  • उद्धव ठाकरेंसोबत संवाद साधण्यासाठी बैठकांची गरज नाही.
  • आम्ही सगळंच केलं असं म्हणणार नाही, पण आम्ही योग्य दिशेने आहोत
  • मुंबईत मेट्रोचं काम सुरु, एप्रिल 2018 पासून रो-रो सेवा मिळणार
  • 31 जानेवारीपर्यंत एलफिन्स्टन, करी रोड आणि आंबिवली स्टेशनवर फूट ओव्हर ब्रीज सैन्य बांधणार
  • देशात आलेला गुंतवणूकदार पहिल्यांदा महराष्ट्राकडे येतो.
  • मुंबई, पुणे, नागपूर सगळीकडे मोठ्या प्रमाणावर काम सुरु
  • शिक्षणात 18 व्या क्रमांकावर होतो, आता 3 ऱ्या क्रमांकावर आलो, आता पहिल्या क्रमांकावर येऊ.
  • डिजिटायझेशनमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
  • सर्वाधिक शौचालयं महाराष्ट्रात, 45 लाख शौचालय बांधली
  • देशातील सर्वात जास्त शौचालय, ग्रामीण घरं महाराष्ट्रात
  • सगळ्यात जास्त ग्रामीण घरं महाराष्ट्रात
  • निती आयोगाचा रिपोर्ट, सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात
  • महाराष्ट्रात आलेला एफडीआय 1 लाख 29 हजार कोटी आहे.
  • नवी मुंबई, नागपूर, शिर्डी अशा सर्वच विमानतळांची काम सुरु केली.
  • गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात जी रेल्वेची कामं बंद होती, ती सुरु केली.
  • 2019 पर्यंत बीडमध्ये रेल्वे नेणार म्हणजे नेणार
  • पायाभूत सुविधांवर सर्वाधिक भार, भारतातील पायाभूत सुविधांचे जास्त प्रकल्प महाराष्ट्रात
  • सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च महाराष्ट्रात होतो.
  • सगळ्यात जास्त भर इन्फ्रास्ट्रक्चर दिला आहे.
  • सिंचनावर पूर्वी फक्त पैसे खर्च व्हायचे, आता रेकॉर्डब्रेक सिंचन प्रकल्प सुरु केले
  • शेतीचा विकासदर 12 टक्क्यांनी वाढला.
  • शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शाश्वत कार्यक्रम गरजेचे, शेती शाश्वत झाल्यानंतर आत्महत्या थांबतील.
  • आत्महत्या आम्हाला मिळालेली लिगसी, या आत्महत्या आज सुरु झाल्या नाहीत.
  • तीन वर्षात शेती क्षेत्रातील गुंतवणुकीत तीन पटीने वाढ
  • राज्यातील शेतकरी एकावेळी दोन-तीन पिकं घेतो.
  • खोटं बोल पण रेटून बोल, ही विरोधकांची स्टाईल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 24 June 2024Anil Parab Full PC : मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे : अनिल परब : ABP MajhaPune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
Embed widget