Majha Katta : गुंतवणुकीतून कोणी मोठ्या परताव्याचं आमिष दाखवत असेल तर सावध व्हा; शोधपत्रकार सुचेता दलाल यांचा इशारा
Majha Katta : हर्षद मेहताचा शेअर मार्केटमधील घोटाळा संपूर्ण जगासमोर आणणाऱ्या प्रसिद्ध पत्रकार सुचेता दलाल यांनी नुकतंच एबीपी माझाच्या 'माझा कट्ट्या'वर हजेरी लावली.
Majha Katta : तुमचे पैसे कोणीही वाढवायला बसलेले नाहीत, फंड आणि बँकामधील मुदतीच्या ठेवीमध्ये जो साधारण परतावा मिळत असेल त्यापेक्षा 3 ते 4 टक्के जरी जास्त पैसे देण्याची कोणी ऑफर दिली तरी सावध होणे गरजेचे आहे असं पत्रकार सुचेता दलाल यांनी म्हटलं. हर्षद मेहताचा शेअर मार्केटमधील घोटाळा संपूर्ण जगासमोर आणणाऱ्या प्रसिद्ध पत्रकार सुचेता दलाल यांनी नुकतंच एबीपी माझाच्या 'माझा कट्ट्या'वर हजेरी लावली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
ओटीटी प्लॅटफॉरर्मवर प्रदर्शित झालेला स्कॅम-1992 या वेब सीरिजने अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या वेब सीरिजचे कथानक हे बहुचर्चित हर्षद मेहता घोटाळ्यावर आधारित आहे. या घोटाळ्याने संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था हादरवून टाकली होती. हर्षद मेहताचा हा 'स्कॅम' संपूर्ण जगासमोर आणणाऱ्या प्रसिद्ध पत्रकार सुचेता दलाल यांनी नुकतीच माझा कट्ट्यावर हजेरी लावली. यावेळी त्यांनी देशाच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेवर तसेच वेगवेगळ्या विषयांवर त्यांची मतं मांडली.
मोठ्या परताव्याच्या आमिषाने जर तुमची फसवणूक झाली तर तुम्ही तुमचे चेक बुक घेऊन त्यांना शोधू शकणार नाही असं सुचेता दलाल म्हणाल्या. हर्षद मेहता हिरो होता की व्हिलन? देशाचे अर्थकारण कोणत्या दिशेने जातंय? सध्या देशाची अर्थव्यवस्था ही चांगली आहे का वाईट? या विषयांवर देखील सुचेता दलाल यांनी बेधडक उत्तर दिली. 'स्कॅम-1992' वेब सीरिज ते देशात होणारे आर्थिक व्यवहार या सर्व गोष्टीवर सुचेता दलाल यांनी दिलखुलासपणे आपली मतं मांडली.
हर्षद मेहता प्रकरणात त्याचा राजकीय संबंध, कोणत्या तरी राजकीय पार्टीचे फंडिग किंवा दुबईवरून अंडरवर्ल्डचा पैसा येतो अशा अनेक चर्चा त्यावेळी केल्या जायच्या. या सगळ्या चर्चांचा त्याला एक प्रकारचा फायदा होत होता असे सुचेता यांनी सांगितले. जेव्हा हर्षद मेहता स्कॅम झाला होता तेव्हा बऱ्याच लोकांनी कर्ज घेतले होते. या स्कॅममुळे अनेक लोकांचे आयुष्य देशोधडीला लागले असेही सुचेता दलाल यांनी सांगितलं
सुचेता दलाल म्हणाल्या की, "काही लोक सध्या गूगल वर सर्च करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत आहेत. कोणताही अभ्यास न करता पैसे गुंतवले जातात त्याची भीती वाटते. कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते. पण जोपर्यंत मार्केट वर जाते तोपर्यंत सर्वच लोक हुशार आहेत असे म्हणता येईल. त्यामुळे कधी काय होईल ते कोणालाच माहीत नाही."
अर्थव्यवहार करताना काय काळजी घ्यावी, सुरक्षित अर्थव्यवहार करताना काय करावे या विषयावर सुचेता दलालांनी त्यांचे मत मांडले.
संबंधित बातम्या :
- भाषेचा अट्टहास हा संस्कृती जपण्यासाठी नाही तर संवाद वाढविण्यासाठी केला पाहिजे : मॅक्सिन मावशी
- कसाबला फाशी देण्यापूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची सूचना काय होती? मीरा बोरवणकर यांनी सांगितली आठवण
- ...आणि तो फोटो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांच्या फ्रन्टपेजवर झळकला; Majha Katta ने दिला 'नर्मदा बचाव'च्या स्मृतींना उजाळा