भाषेचा अट्टहास हा संस्कृती जपण्यासाठी नाही तर संवाद वाढविण्यासाठी केला पाहिजे : मॅक्सिन मावशी
मातृभाषेबरोबरच इंग्रजी देखील मुलांना शिकवता येते. विदयापीठामध्ये जे शिक्षक आहे. त्यांना इंग्रजी बरोबर भारतीय भाषा येणे सक्तीचे केले पाहिजे, असे मॅक्सिन मावशी म्हणाल्या.
मुंबई : देशातील पालकांचा इंग्रजी माध्यमामध्ये ओढा जास्त आहे. मातृभाषा शिकताना मुलांना इंग्रजी भाषेची तोंडओळख पाहिजे. भाषा शिकणे अवघड नाही त्यासोबत लेखन, वाचन देखील गरजेचे आहे. मुलांचे मातृभाषेवरील प्रभुत्व देखील चांगले राहिले पाहिजे याची काळजी घेतली. नोकरी मिळते पण मुलांना आपल्या मातृभाषेविषयी आस्था राहत नाही. भाषेचा अट्टहास हा संस्कृती जपण्यासाठी नाही संवाद वाढविण्यासाठी केला पाहिजे, असे मत मॅक्सिन मावशींनी व्यक्त केले आहे. मॅक्सिन मावशी आज माझा कट्ट्यावर बोलत होत्या.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपलं आयुष्य समर्पित केले आहे. मॅक्सिन मावशी पुढे म्हणाल्या, सध्याच्या काळात इंग्रजीचे महत्त्व खूप आहे. मातृभाषेबरोबरच इंग्रजी देखील मुलांना शिकवता येते. विदयापीठामध्ये जे शिक्षक आहे. त्यांना इंग्रजी बरोबर भारतीय भाषा येणे सक्तीचे केले पाहिजे. भारतीय भाषा सर्वांना येणे गरजेचे आहे.
फलटणला असताना काही अडचणी आल्या नाही. दलित वस्तीमध्ये आपली शाळा म्हणून अनौपचारिक वर्ग हा उपक्रम सुरू केला होता. त्या मुलांना शाळेत दाखल करून घेणे अत्यंत कठीण होते. दलित मुले वाईट आहेत. ते चोरी करतात अशी कल्पना लोकांच्या मनात होती. परंतु आता हे चित्र बदलले असून अनेक दलीत मुले शाळेत जात आहे आणि ते वेगळ्या वेगळ्या पदावर आहेत, असे मॅक्सिन मावशी म्हणाल्या.
मॅक्सिन मावशी म्हणाल्या, शिक्षण आणि शाळा जास्त रूक्ष होता कामा नये. निरर्थक पाठंतरावर भर दिला तर मुलांना शिक्षणात रस राहत नाही. शिक्षण हे आनंददायी असावे. त्यात बुद्धीचे वापर हवा फक्त शाब्दिक ज्ञान नसावे. फक्त पाठांतर नको मनापासून प्रत्येक विषय आत्मसात केला पाहिजे. मुलांना प्रेमाने शिक्षण दिले पाहिजे. शिक्षणात गांभीर्य असावे पण त्यातून मुलांना गोडी लागली पाहिजे.
सिनेमा मला जास्त आवडत नाही. पंडित भीमसेन जोशी मला जास्त आवडतात. लता मंगेशकरांपेक्षा मला आशा भोसले जास्त आवडतात. "नाच रे मोरा" हे बालगीत मला जास्त आवडते. 11 वीत असताना मी एक व्याख्यान ऐकले होते. भारतात लोकशाही कशा पद्धतीने नांदते हे मला पाहायचे होते. त्याचा अभ्यास करायचा होता, मॅक्सिन मावशी म्हणाले.