एक्स्प्लोर
उन्हाळ्याच्या तोंडावर वीजदरवाढीचा शॉक बसण्याचे संकेत
नागपूर : ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच राज्य सरकारनं वीज दरवाढीचा शॉक दिला आहे. महावितरणनं तब्बल 12 टक्क्यानं वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
महावितरणच्या मागणीला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. उन्हाळ्यात ग्राहकांना एसी, कूलर, फ्रीजचा वापर वाढतो. त्यामुळे जास्तीचं वीज बिल येऊन तुम्हाला धक्का बसण्याची चिन्हं आहेत.
गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी दरवाढ ठरणार आहे. शेतीसाठी दिलेली सबसिडी आणि ऑपरेशन आणि मेंटेनन्स मुळे सध्या 24 हजार 251 कोटींचा तोटा महावितरणला सहन करावा लागत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement